शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नेतर्डे येथील तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:07 IST

नेतर्डे-लिंगाचा मळा येथील सुशांत हिरे गवस (३५) या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी नदीवर पोहोण्यास गेलेल्या युवकाचा मृतदेह नदीपात्रात रविवारी सकाळी तरंगताना आढळून आला.

ठळक मुद्देनेतर्डे येथील तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यूआकस्मिक निधनाने नेतर्डे परिसरात हळहळ

बांदा : नेतर्डे-लिंगाचा मळा येथील सुशांत हिरे गवस (३५) या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी नदीवर पोहोण्यास गेलेल्या युवकाचा मृतदेह नदीपात्रात रविवारी सकाळी तरंगताना आढळून आला.

याची बांदा पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुशांत गवस शनिवारी सायंकाळी नदीवर आंघोळीसाठी गेला होता. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी पुन्हा शोधाशोध केली असताना नदीपात्रात सुशांतचा मृतदेह तरंगताना आढळून आला.याची माहिती अशोक नारायण गवस यांनी बांदा पोलिसांना दिली. बांदा पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून मृतदेह विच्छेदन करण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. सायंकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी शवविच्छेदन केले.

मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. सुशांत हा विवाहित होता. त्याच्या आकस्मिक निधनाने नेतर्डे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग