शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

योगेश तावडे यांना शिवसन्मान पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:05 IST

सिंधुदुर्गनगरी : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्रामार्फत दिला जाणारा महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार ओरोस ...

ठळक मुद्देयोगेश तावडे यांना शिवसन्मान पुरस्कार प्रदानजेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते पुरस्कार वितरित

सिंधुदुर्गनगरी : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्रामार्फत दिला जाणारा महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार ओरोस येथील युवा सामाजिक कार्यकर्ते योगेश राजाराम तावडे यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार कोल्हापुर येथील एका कार्यक्रमात जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्राच्यावतीने महाराष्ट्राच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या आणि सामाजिक कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील तरुण तरुणांना शिवसन्मान पुरस्कार दिला जातो. तसेच त्यांनी केलेल्या कार्याची नोंद भारत सरकार मान्य आयएसबीएन युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकोर्डमध्ये केली जाते.

नागरिकांना रात्री अपरात्री मदत करणे, सामाजिक कार्यात पुढे असणे आदी विविध सामाजिक कार्य करणाऱ्या ओरोस गावडेवाडी येथील योगेश राजाराम तावडे या युवकाच्या कार्याची किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र या संस्थेने दखल घेत त्याला युवा समाजिक कार्यकता शिवसन्मान पुरस्कार जाहीर केला होता.

कोल्हापुर शाहू महाराज स्मारक हॉल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या छत्रपती शिवराय नवरंग कला, साहित्य, संमेलन कोल्हापुर २०१९ मध्ये जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते योगेश तावडे यांना शिवसन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून त्याच्या कार्याची नोंद युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकोर्डमध्ये झाली असून त्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग