शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

कुणकेश्‍वर यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ!, भक्‍तीचा मळा फुलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 15:44 IST

एस.टी कर्मचारी संपाचा काहीसा परिणाम यावर्षी भाविकांच्या संख्येवर झाला आहे

देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीदेव कुणकेश्‍वर (सिंधुदूर्ग) महाशिवरात्री यात्रोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. गतवर्षी कोरोनामुळे ग्रामस्तरावर साध्या पद्धतीत हा उत्सव पार पडला होता. मात्र, यावर्षी कोरोना नियमांचे पालन करून यात्रोत्सव होणार असल्याने कुणकेश्‍वर यात्रेत पुन्हा भक्‍तीचा मळा फुलला आहे.यात्रा कालावधीत देवदर्शन व तीर्थस्थानाकरिता भाविकांचा महासागर उसळण्याची शक्यता आहे. मात्र, एस.टी कर्मचारी संपाचा काहीसा परिणाम यावर्षी भाविकांच्या संख्येवर झाला आहे.यावर्षी कुणकेश्‍वर भेटीसाठी भरतेश्‍वर मसुरे व पावणाई रवळनाथ मालोंड या दोन देवस्वार्‍या तिर्थस्नानास येणार आहेत. बुधवारी पहाटेपासून समुद्र किनार्‍यावर धार्मिक विधी,देवस्वार्‍यांचे व भाविकांच्या तिर्थस्नानाला सुरुवात होईल. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांना दर्शन घेणे, मंदिर परिसर व समुद्र किनारी जाणे यासाठी नियोजन करण्यात आले आहे.देवस्थान ट्र्स्ट तसेच ग्रामपंचायत यांच्यावतीने प्रत्येक व्यापार्‍यांना दुकानाच्या सीमा ठरवून दिल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाई, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने यांनी यात्रा परिसर फुलुन गेला आहे. यावेळी यात्रेच्या ठिकाणी पारंपारिक शेती अवजारे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली आहेत. त्याचप्रमाणे क्लोज सर्किट कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. अधिकारी व कर्मचार्‍यांसहीत एकूण ३८० पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.आरोग्य विभागाकडून चोख व्यवस्था!आरोग्य विभागामार्फत ६४ कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी १, आरोग्य अधिकारी १२, समुदाय आरोग्य अधिकारी ६, आरोग्य पर्यपेक्षक १, आरोग्यसेवक १३, आरोग्यसेविका १२, परिचर ६, आरोग्य सहाय्यक ८, रूग्णवाहीका चालक ५ असे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.२४ तास वैद्यकीय सेवा देण्यासाठी दोन पथके कुणकेश्‍वर प्राथमिक शाळा, भक्तनिवास येथे कार्यरत राहणार आहेत.पाणीशुध्दीकरण आणि पिण्याचा पाण्याची तपासणी यासाठी दोन पथके कार्यरत आहेत.वीज वितरणकडून नियोजन!कुणकेश्‍वर यात्रा कालावधीत वीजप्रवाह सुरळीत राहण्यासाठी वीज वितरणची टीम तैनात करण्यात आली आहे. जामसंडे सबस्टेशन, तळेबाजार सबस्टेशन येथून दोन फीडरवरून वीजप्रवाह सुरळीत ठेवण्यात येणार आहे.वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता १, शाखा अभियंता ७ व दोन शिफ्टमध्ये २६ कर्मचारी तैनात आहेत.देवगड व विजयदुर्ग आगारातून १३ फेर्‍या!कर्मचार्‍यांचा संपाचा फटका एस.टीला बसला आहे. मात्र, यात्रेसाठी देवगड व विजयदुर्ग आगारातून एकूण १३फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे.देवगड एसटी आगारातून एकूण १० फेऱ्या होणार असून यामध्ये देवगड आगारातून ८, जामसंडे १ व तळेबाजार १ अशा फेर्‍या सोडण्यात येणार आहेत तर विजयदूर्ग आगारातून तीन फेर्‍या सोडण्यात येणार आहेत.पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन!दरवर्षीप्रमाणे वाहतुकीचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तारामुंबरी- मिठमुंबरी पुलामुळे देवगडकडील बहुतांशी वाहतुक ही पुलावरून होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होईल.तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.प्रवाशांसाठी मोफत बससेवा!देवगड जामसंडे नगर पंचायत हद्दीतील कुणकेश्‍वर यात्रेस जाणार्‍या भाविकांसाठी शिवसेना नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी त्यांच्या साई ट्रॅव्हलर्सची मोफत बससेवा १ मार्च रोजी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत ठेवली आहे.खाकशी तिठा, दिर्बादेवी स्टॉप,जामसंडे बाजारपेठ, वडांबा, फाटक क्लास, शिवसेना शाखा, मांजरेकर नाका, ब्राम्हणदेव मंदिर तारामुंबरी नाका ते कुणकेश्‍वर असे नियोजन केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग