शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वांत मोठे आंब्याचे पान कोकणात, जागतिक रेकॉर्ड होल्डर; कुडाळ येथील बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 13:54 IST

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील शेती व बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान ठरले जगातील ...

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील शेती व बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान ठरले जगातील सर्वांत मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान. आणि चंद्रकांत काजरेकर ठरले जागतिक रेकॉर्ड होल्डर.निसर्गात अशा बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात; पण, त्या प्रकाशात आणणे महत्त्वाचे असते. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी व नंतर अकाउंट व्यवस्थापक म्हणून सुमारे ३२ वर्षे सेवा करून निवृत्त झाल्यानंतर आपली आंबा व काजू बागायतीची आवड जोपासत असताना काजरेकर यांना आपल्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या साहाय्याने जागतिक रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते. या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपल्या मुली डॉ. नालंदा परब व डॉ. नुपूर अगरवाडकर आणि जावई धीरज परब व डॉ. देवेन अगरवाडकर यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला. त्यानंतर पुनर्तपासणीचे रेकॉर्ड तयार करताना संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली.महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रवींद्र यशवंत ठाकूर, प्राध्यापक उमेश मिलिंद कामत व प्राध्यापक दयानंद विश्वनाथ ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडीओ शूटिंग व रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. या कामात डॉ. दीपाली काजरेकर, डॉ. नालंदा परब व डॉ. नुपूर अगरवाडकर व जावई धीरज परब तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओची टीम यांचे सहकार्य लाभले. व जगातील सर्वांत मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान असल्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड व वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली. कुडाळ तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि इंडिया या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदविले गेले. या पानाची लांबी ५५.६ सेंमी व रुंदी १५.६ सेंमी आहे. यापूर्वी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत त्यांनी नवनवीन प्रयोग केले.कुडाळ येथील आपल्या राहत्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर शेकडो सुपाऱ्या व काजूची रोपे तयार करून नर्सरीचा यशस्वी प्रयोग केला. तसेच तळवडे सावंतवाडी येथील शेतात बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, लावणी, कापणी, मळणी इत्यादी यंत्रांच्या साहाय्याने शेती करणे. दुर्मीळ वनौषधीची लागवड व संवर्धन यांचेही यशस्वी प्रयोग केले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMangoआंबा