शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

 पणदूर तिठा येथे चुकीच्या पद्धतीने काम; महामार्गावरील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:31 IST

कुडाळ : पणदूर तिठा येथे महामार्गाचे चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी तेथील दुकाने व घरांमध्ये ...

ठळक मुद्दे पणदूर तिठा येथे चुकीच्या पद्धतीने काम; महामार्गावरील वाहतूक ठप्पनागरिक, व्यापाऱ्यांनी महामार्ग धरला रोखून

कुडाळ : पणदूर तिठा येथे महामार्गाचे चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी तेथील दुकाने व घरांमध्ये शिरले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिक व व्यापाऱ्यांनी तब्बल दोन तास महामार्ग रोखून आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान, जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महामार्गाची पाहणी करून महामार्गासंबंधी असलेल्या सर्व समस्या सोडविण्याचे आदेश दिले.कुडाळ तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारीही पावसाला जोर होता. पणदूर तिठा येथे महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मात्र, चौपदरीकरणावेळी येथील पाणी वाहून नेण्यासाठी नव्याने घालण्यात आलेल्या मोरीतून हे पाणी जात नसल्याने तेथे पाणी साचू लागले. हे साचलेले पाणी महामार्गाच्या जवळच असलेल्या दुकाने आणि घरांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली.त्यामुळे संतप्त झालेले नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दिलीप बिल्डकॉनने केलेल्या चुकीच्या कामाविरोधात शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महामार्ग रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होऊन त्याचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसला. दरम्यान, दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येत पाण्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.महामार्गाची दुर्दशादोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात ठिकठिकाणी महामार्गाची दुर्दशा झाली आहे. पणदूर तिठा ते ओरोस दरम्यानचा व पावशी बेलनदी येथील रस्ता खचला असून काही ठिकाणची माती वाहून गेल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  दरम्यान, पालकमंत्री केसरकर यांनी कुडाळ तालुक्यातील महामार्गाची पाहणी करीत येत्या काही दिवसांत महामार्गासंबंधी निर्माण झालेल्या सर्व समस्या सोडविण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग