शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पंतप्रधानांच्या संकल्पपूर्तीसाठी एकदिलाने कामाला लागा, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन 

By सुधीर राणे | Updated: January 15, 2024 12:59 IST

कणकवली येथे महायुतीचा संयुक्त मेळावा

कणकवली: आपला देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. २०३० सालापर्यंत दरडोई उत्पन्नात आपला देश जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. प्रामाणिकपणे, निष्ठेने एकत्रितपणे काम करून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवाराला बहुमताने निवडून आणले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी आतापासूनच एकदिलाने कामाला लागा असे आवाहन केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात रविवारी आयोजित महायुतीच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली , ऍड.अजित गोगटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, प्रज्ञा परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,  शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, भाजप महिला आघाडी अध्यक्षा श्वेता कोरगावकर, अविनाश चमणकर,सावळाराम अणावकर, सचिन वालावलकर, मनोज रावराणे, रणजित देसाई, संतोष कानडे, रुपेश पावसकर, संदीप मेस्त्री, सुरेश गवस यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.राणे म्हणाले, तीन पक्षांचा हा मेळावा आहे,लोकसभेचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी आपण काम केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी जनतेला ५४ योजना दिल्या आहेत.८० कोटी लोकांना धान्य मोफत दिले आहे.त्यासाठी साडेतीन लाख कोटी खर्च येत आहे. आयुष्मान भारत योजना, उज्वला गॅस योजना ,मोफत घरांची योजना,नळ पाणी योजना अशा योजनांचा लोकांना लाभ मिळतोय. लोकांमध्ये जाऊन या योजनांची माहिती सांगा. त्याची लाभार्थीना जाणीव करुन द्या. फक्त नुसती चर्चा न करता आपण काम केले पाहिजे. गरिबांना चांगले दिवस दाखवण्याचे काम भाजप करेल. आता कोणाचेच फलक लावू नका,उमेदवार ठरला की आम्हीच त्यांचे फलक लावू. राणे भाजप म्हणू नका. तर, आता फक्त भाजपाच असेल.

नरेंद्र मोदी यांच्या साथीला आपला खासदार असला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा. पुढच्या ५ वर्षात जिल्ह्याचा कायापालट होईल.१९६६ मध्ये २ रुपये भरून शिवसैनिक झालो. जे कधी जवळ पण गेले नाहीत,ते आता बाळासाहेब कसे होते हे सांगताहेत.मात्र, ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला धोका होता.तेव्हा मी त्यांच्या सोबत होतो. त्यांचा सहवास माझ्या एवढा  कोणाला लाभला नाही. माझे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर कोणी टीका केल्यास ती आम्ही सहन करणार नाही,असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे