शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हे तर कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम : वैभव नाईक यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:58 IST

Tauktae Cyclone VaibhavNaik Sindhudurg : तौक्ते चक्रीवादळ येऊन तब्बल २२ दिवस उलटले आणि आता केंद्रीय समितीचे पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणीसाठी दाखल झाले आहे. राज्याला मदत न करता केंद्रीय समितीच्या पथकाने केवळ पाहणी दौरा करून नुकसानग्रस्त कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे

ठळक मुद्देहे तर कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम : वैभव नाईक यांची टीका केंद्रीय समितीकडून नुकसानग्रस्त भागाची आता पाहणी

कणकवली : तौक्ते चक्रीवादळ येऊन तब्बल २२ दिवस उलटले आणि आता केंद्रीय समितीचे पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणीसाठी दाखल झाले आहे. मात्र गुजरातमध्ये वादळ धडकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने पाहणी दौरा करून एक हजार कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते.

महाराष्ट्र राज्यात मात्र केंद्राकडून ही तत्परता दाखवण्यात आली नाही. महाराष्ट्र राज्याला मदत न करता केंद्रीय समितीच्या पथकाने केवळ पाहणी दौरा करून नुकसानग्रस्त कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहेयाबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर राज्यांना मदत करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्यच असते. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत दुजाभाव करत आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने नवीन नियमांनुसार जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून यासाठी आवश्यक निधीची तरतूददेखील करण्यात आली आहे.त्याची कार्यवाही पूर्णत्वास नेली जात असून दोन दिवसांनी प्रत्यक्षात नुकसानग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. याबद्दल केंद्रीय समितीने राज्य सरकारचे कौतुक करणे अपेक्षित होते. मात्र केंद्रीय समितीने जिल्हा प्रशासनावर प्रश्नांची सरबत्तीकेली.केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यात नारायण राणेंना डावललेजिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आलेले विरोधी पक्षनेते व जिल्ह्यातील भाजपचे खासदार यांनी आपले वजन वापरून राज्याला केंद्राकडून मदत मिळवून देणे अपेक्षित आहे. मात्र केंद्रीय समितीने तब्बल २२ दिवसांनी सिंधुदुर्गमध्ये येऊन केवळ पाहणीच केली. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे खासदार नारायण राणे व स्वयंघोषित भाजप नेते यांचे केंद्रात किती वजन आहे, हे यानिमित्ताने आपल्याला दिसून येते.केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यात राणेंना स्थान दिले जात नाही. यावरून केंद्रातील भाजप सरकारमध्ये त्यांची किती केविलवाणी अवस्था झाली आहे, हे एव्हाना जिल्हावासीयांना कळून चुकले आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आपली पात्रता ओळखावी, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळShiv SenaशिवसेनाVaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग