शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे 'हाफ'तिकीट एसटीसाठी ठरले लाभदायक; सिंधुदुर्ग विभागाला आठ महिन्यात मिळाले 'इतक्या' कोटींचे उत्पन्न

By सुधीर राणे | Updated: December 27, 2023 17:57 IST

कणकवली : महिला सन्मान योजनेंतर्गत एसटी महामंडळाच्या वातानुकुलीतसह सर्व बसेमधून महिलांना प्रवासात अर्धे तिकीट आकारण्यात येत आहे. १७ मार्च ...

कणकवली : महिला सन्मान योजनेंतर्गत एसटी महामंडळाच्या वातानुकुलीतसह सर्व बसेमधून महिलांना प्रवासात अर्धे तिकीट आकारण्यात येत आहे. १७ मार्च २०२३ पासून सुरू झालेल्या या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. १ एप्रिल २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ या आठ महिन्यांच्या कालावधीत एसटीच्या सिंधुदुर्ग विभागात ३ कोटी ११ लाख २९ हजार महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे. त्यातून या विभागाला ३७ कोटी ८२ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे महिलांचे 'हाफ'तिकीट एसटीसाठी लाभदायक ठरत आहे. या योजनेमुळे एसटीतील महिला प्रवासी संख्या वाढल्याने सिंधुदुर्ग विभागाला ३७  कोटी ८२ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर तेवढीच रक्कम शासनाकडून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून सिंधुदुर्ग विभागाला म्हणजेचे एसटी महामंडळाला मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीसाठी ही योजना एकप्रकारे संजीवनीच ठरणार आहे.एसटीची प्रवासी संख्या वाढण्यास मदत झाली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आगारातून सुटणाऱ्या गाड्यांमधून ८ लाख ७ हजार महिला प्रवाशांनी प्रवास केल्यामुळे ८२ लाख ५८ हजार एवढे उत्पन्न मिळाले आहे.

राज्य सरकारने गत वर्षीच्या अर्थसंकल्पावेळी महिलांना ५० टक्के एसटीच्या तिकिटात सवलत देण्याचे जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेनंतर महिला प्रवासी वाढल्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढले आहे. त्याचा महामंडळाला चांगला फायदा होत आहे. प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा. -अभिजित पाटील,सिंधुदूर्ग विभाग नियंत्रक.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग