शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उमेद अभियान खंडित करण्याचा निर्णय मागे घ्या, सिंधुदुर्गनगरीत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 16:51 IST

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची सेवा खंडित करणारा १० सप्टेंबरचा अन्यायकारक शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधु संघर्ष कर्मचारी कल्याणकारी मंडळाच्यावतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे उमेद अभियान खंडित करण्याचा निर्णय मागे घ्या, सिंधुदुर्गनगरीत धरणे आंदोलन : ५० हून अधिकांचा सहभाग, सिंधु संघर्ष कर्मचारी कल्याणकारी मंडळ आक्रमक

सिंधुदुर्गनगरी : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची सेवा खंडित करणारा १० सप्टेंबरचा अन्यायकारक शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधु संघर्ष कर्मचारी कल्याणकारी मंडळाच्यावतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या १० सप्टेंबरच्या पत्रान्वये पुनर्नियुक्ती थांबविण्याचे आदेश शासनाने दिल्याने सद्यस्थितीत राज्यभरातील पाचशेहून अधिक अधिकारी, कर्मचारी यांची अभियानातील सेवा एका क्षणात संपुष्टात आली आहे. तर अन्य कर्मचाºयांची सेवाही धोक्यात आली.हा निर्णय मागील आठ वर्षांपासून कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, भविष्यातील वाटचालीवर विपरीत परिणाम करणारा आहे. तसेच संबंधित कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अन्यायकारक आहे.

सद्यस्थितीत अभियानामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने अवलंबिलेले धोरण अभियानाचा मूळ उद्देश पूर्ण होण्याच्या अगोदरच ठप्प करणारे आहे. अभियानातील कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना संक्रमण कालावधी असतानाही सर्व नियमांचे पालन करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या आंदोलनात सुमारे ५० हून अधिक कंत्राटी अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यात संघटनेचे अध्यक्ष निलेश वालावलकर यांच्यासह वैभव पवार, प्रसाद कांबळे, शिवराम परब, स्वाती रेडकर, सिया गावडे, प्रिया धरणे, विनायक राणे, ज्ञानदा सावंत आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.८१ जणांची सेवा खंडित होणारसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५३ पुरुष व २८ महिला अशा८१ अधिकारी, कर्मचाºयांचा यात समावेश आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या १० सप्टेंबरच्या आदेशानुसार अभियानांमध्ये कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांची अभियानातील सेवा तत्काळ व नजीकच्या काही महिन्यांत खंडित होणार आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग