शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

संघटनेचे उपक्रम स्तुत्यच

By admin | Updated: January 29, 2015 23:32 IST

विजयकुमार वळंजू : तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेचा वर्धापनदिन

तळेरे : तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेच्या विविध कार्यक्रमांतून नेहमीच एकता दिसते. वर्षभर ग्राहकांना सेवा देतानाच विविध उपक्रम राबविले जातात, तेही स्तुत्य आणि अनुकरणीयच आहे, असे मत जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू यांनी व्यक्त केले. तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेचा वर्धापनदिन व पुरस्कार वितरण कार्यक्रमात वळंजू बोलत होते.यावेळी श्रावणशेठ बांदिवडेकर, ज्येष्ठ व्यापारी शांतिनाथ लडगे, जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह महेश नार्वेकर, कणकवली तालुकाध्यक्ष विशाल कामत, तळेरे सरपंच दर्शना बांदिवडेकर, उपसरपंच शशांक तळेकर, तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष चंद्रशेखर डंबे, सेक्रेटरी राजेंद्र पिसे, चंद्रकांत तळेकर, बाबा भांबुरे, जिल्हा व्यापारी महासंघाचे सदस्य राजू जठार, दादा पिसे, सुरेश डंबे, दीपक जठार, संतोष कल्याणकर, वासुदेव वाडेकर, दादा महाडिक, आदी उपस्थित होते.वळंजू म्हणाले, तळेरेच्या आदर्श व्यापारी संघटनेचे कार्य आदर्शवत आहे. विविध सामाजिक उपक्रमांतून याचे प्रतिबिंब दिसून येते. ऋयावेळी आयोजित हळदी-कुंकू समारंभाला दशक्रोशीतील सुमारे दोन हजार महिलांनी उपस्थिती दर्शविली. व्यापारी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी सत्यनारायणाची महापूजा, तळेरे येथील बुवा संतोष तळेकर, बुवा राजू वळंजू यांची सुश्राव्य भजने, रात्री श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, कासार्डेचे बुवा मंगेश खाडये व श्री मालोबा प्रासादिक भजन मंडळ पाळेकरवाडीचे बुवा दीपक पाळेकर यांच्या ट्वेंन्टी-२० डबलबारी भजनाचा जंगी सामना झाला.तळेरे तालुका व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल. तळेरे व्यापारी संघटनेच्यावतीने त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. यावेळी लवकरात लवकर नवीन तळेरे तालुका होण्याबाबतचा निर्धार केला गेला.तळेरे येथील भजनी बुवा संतोष तळेकर यांच्यासह अनेक बुवांना ज्यांनी घडविले, असे भजनसम्राट गुणाजी पाळेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल सोरप, दत्तात्रय कल्याणकर, राकेश तळेकर, सुरेश तळेकर, समीर चव्हाण, अरविंद मुद्राळे, शिवसेना तालुका उपाध्यक्ष शरद वायंगणकर, प्रसाद कल्याणकर, बाजारपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष उल्हास कल्याणकर, कासार्डे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपत पाताडे, संजय नकाशे, प्रवीण पोकळे, कासार्डे सरपंच संतोष पारकर, उपसभापती संतोष कानडे, पंचायत समिती सदस्य संजय देसाई, ओझरम सरपंच प्रदीप राणे, व्यापारी संघटनेचे सर्व सभासद, तसेच रिक्षा, टेम्पो, सलून संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विजय शेलार यांनी मिमिक्री सादर केली. राजू माळवदे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)कै. दत्तात्रय तुकाराम जठार स्मृती यशस्वी उद्योजक पुरस्कार तळेरे येथील ज्येष्ठ व्यापारी बाप्पा पटेल यांना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू यांच्या हस्ते देण्यात आला. जिल्हा व्यापारी महासंघाचे सदस्य राजू जठार यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केला असून, गेली सात वर्षे हा पुरस्कार आदर्श व्यापारी संघटना तळेरेच्यावतीने देण्यात येतो.