शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची युवा फळी मजबूत करण्यासाठी राज्यभर दौरा करणार - विशाल परब 

By अनंत खं.जाधव | Updated: October 23, 2023 17:06 IST

सावंतवाडी : पक्षाच्या नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावणार असून युवा मोर्च्याच्या माध्यमातून भाजपाची युवा फळी मजबूत करणार आहे. त्यासाठी ...

सावंतवाडी : पक्षाच्या नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावणार असून युवा मोर्च्याच्या माध्यमातून भाजपाची युवा फळी मजबूत करणार आहे. त्यासाठी आगामी काळात राज्यभर दौरा करणार असल्याचे भाजपा युवा मोर्च्याचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आपणास केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलेश राणे यांच्यामुळे हे पद मिळाले आहे. येणाऱ्या काळात येथील युवकांना सक्षम करण्यासाठी माझा वाटा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परब यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सावंतवाडीत त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, जीतू गावकर, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते. परब म्हणाले, या ठिकाणी माझे काम पाहून पक्षाच्या नेतृत्वाने मला राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात युवा संघटना मजबूत करण्याबरोबर युवकांच्या हाताला काम कसे मिळेल, यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू राहणार आहे. आता राज्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात राज्यभर दौरे करुन त्या ठिकाणी संघटना मजबूत होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा युवा मोर्च्याचे अध्यक्ष राहुल लोणीकर यांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तसेच केवळ राणे कुटुंब सोबत असल्यामुळेच मला हे पद मिळू शकले आणि मिळालेल्या पदाचा योग्य पध्दतीने आपण वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात युवापिढी सक्षम झाली पाहिजे यासाठी आपले प्रयत्न राहणार असून त्याच्या कल्याणासाठी नवनवीन रोजगार आणणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शहराध्यक्ष गोंदावळे यांनी त्यांना लाडू भरवून अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा