शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

माकडतापावरील लसीसाठी केंद्राला प्रस्ताव पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 16:10 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढते माकडतापाचे रुग्ण लक्षात घेता माकडतापावरील लस केंद्राकडून उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारला लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. याबाबत ओरोस येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चाही झाली आहे

ठळक मुद्देआरोग्य सचिवांची कुटीर रुग्णालयाला भेट व्हायरॉलॉजी लॅब एप्रिलमध्ये सुरू होणार

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढते माकडतापाचे रुग्ण लक्षात घेता माकडतापावरील लस केंद्राकडून उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारला लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. याबाबत ओरोस येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चाही झाली आहे. तसेच व्हायरॉलॉजी लॅब एप्रिलमध्ये सुरू होणार असून, त्यामुळे वेगवेगळ््या आजारांची लक्षणे वेळेत मिळतील आणि उपचार पद्धती सोप्या होणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांनी दिली.डॉ. व्यास यांनी मंगळवारी दुपारी सावंतवाडी कुटीर रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर येथील विविध समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर तसेच अन्य नागरिकांनी मते मांडली. यावेळी आरोग्य उपसंचालक हेमंत बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकुरकर, सावंतवाडीचे वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर दुर्भाटकर, अभिजीत चितारी, डॉ. बागवान, संदीप सावंत आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. व्यास म्हणाले, सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात माकडतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. माकडतापावर लस उपलब्ध आहे. पण ती मिळावी यासाठी केंद्र सरकारला लवकरच एक प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या ओरोस येथील बैठकीत चर्चाही झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोग्याच्या समस्येवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना दिली आहे. त्याप्रमाणे काम सुरू असल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.व्हायरॉलॉजी लॅबचे काम सुरू आहे. हे कामही एप्रिलमध्ये पूर्ण होणार असून, नंतर कोणतीही रक्तचाचणी बाहेर जाऊन करण्याची गरज भासणार नाही. सर्व रक्तचाचण्या एकाच ठिकाणी होतील. माकडतापावरील रक्त चाचणीची समस्याही यातून सुटून जाईल. काम लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले आहेत, असेही डॉ. व्यास म्हणाले.मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीतच होणारसावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे काम लवकरच सुरू होणार आहे. जागेचा वाद मिटल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. सावंतवाडीतून हे रुग्णालय अन्यत्र हलविले जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. मात्र, जागेचा वाद लवकरच मिटावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मसुरकर यांनी अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे आरोग्य अधिकाऱ्यांवर येणाऱ्या ताणाबाबत सचिवांकडे गाऱ्हाणे मांडले. मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू झाले की या सर्व समस्या सुटतील, असे डॉ. व्यास यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग