शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग निकृष्ट कामाबाबत याचिका दाखल करणार : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 19:49 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय कुठे उभारायचे यावरून शिवसेनेचेच लोकप्रतिनिधी राजकारण करून दिशाभूल करीत आहेत, असा आरोप माजी आमदार व मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी कुडाळ येथे केला. महामार्ग चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामकाजाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमहामार्ग निकृष्ट कामाबाबत याचिका दाखल करणार : परशुराम उपरकर रुग्णालयाबाबत शिवसेनेचे पदाधिकारी दिशाभूल करतात

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय हे खरेतर कुडाळमध्येच उभारण्याचा अजूनही शासन निर्णय आहे. मात्र, याबाबत तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यावेळी केवळ बैठक घेऊन ते सावंतवाडीत करण्याचा घाट घातला होता. आता शिवसेनेचेच लोकप्रतिनिधी हे रुग्णालय कुठे उभारायचे यावरून राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत, असा आरोप माजी आमदार व मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर केला. महामार्ग चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामकाजाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहावर माजी आमदार व मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव बाळा पावस्कर, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, राजेश टंगसाळी, रामा सावंत, संतोष सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीत की अन्य कोठे बांधण्यात यावे यावरून शिवसेनेचेच लोकप्रतिनिधी राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. हे रुग्णालय खरेतर कुडाळ येथे मंजूर असल्याचा शासन निर्णय असतानाही तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यावेळी केवळ बैठक घेऊन ते रुग्णालय सावंतवाडीत करण्यात येईल असे सांगत भूमिपूजन केले होते.मात्र, अद्यापही ते रुग्णालय कुडाळमध्येच करण्याच्या शासन निर्णयात कोणताच बदल झालेला नाही. आता खासदार, आमदार राजकारण करीत असून सावंतवाडी येथील काही शिवसेनेचे पदाधिकारी केसरकर यांच्या तर काहीजण खासदार विनायक राऊत यांच्या बाजूने असल्याने शिवसेनेत दोन गट असल्याचे दिसत आहेत.सातारा जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय हे सर्व एकाच ठिकाणी ६० एकरच्या जागेत आहे. त्यामुळे चांगल्याप्रकारे सेवा सुविधा तिथे उपलब्ध होतात. अशाच धर्तीवर हे रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दोन्ही एकत्र असणे गरजेचे आहे. त्यामुळे ते शासन निर्णयाप्रमाणे कुडाळमध्ये व्हावे, असेही उपरकर यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.उच्च न्यायालयात दाद मागणारमहामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे आम्ही सुरुवातीपासून सांगितले. सोमवारी कणकवली येथील संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेवरून तेथील महामार्गाच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे कामाची पाहणी करून फोटो काढणाऱ्यांना आता कळले असेल, असाही टोला त्यांनी लगावत महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामाबाबत, आॅडिटबाबत व भौगोलिक परिस्थितीचा आढावा न घेता काम केल्याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर