शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 15:16 IST

CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी तातडीने चर्चा करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आढावा बैठकीदरम्यान स्पष्ट केले.

ठळक मुद्देऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार : प्रजित नायर कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील घेतला आढावा

कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी तातडीने चर्चा करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आढावा बैठकीदरम्यान स्पष्ट केले.

नायर यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालय व शिरवल येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करून कोविड रुग्णांच्या सुविधांबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी आमदार वैभव नाईक व अधिकाऱ्यांशी संवाद साधत रुग्णांना देण्यात येणारी सेवा व कमी पडत असलेल्या बाबींवर चर्चा केली. तसेच रुग्ण सेवेबाबत येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी अभिजित हजारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, आरोग्य विभागाचे प्रशांत बुचडे उपस्थित होते.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएचसी सेंटरमधील बेडला पुरेसा ऑक्सिजन आहे का? याबाबत आढावा घेतला. त्यावेळी आरोग्य विभागाकडून कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएचसीमध्ये एकूण १० बेड असून, त्यातील ६ बेड हे ऑक्सिजनचे व ४ बेड व्हेंटिलेटरचे आहेत.

मात्र, व्हेंटिलेटरचा वापर हा अतिगंभीर रुग्णांसाठी होतो. त्यामुळे ऑक्सिजनचे बेड व पुरवठा वाढविण्याची गरज असल्याचे मत आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आले. त्यावर नायर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याशी चर्चा करून पुरेसा ऑक्सिजनसाठा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला देण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असेही सांगितले.यावेळी रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही नायर यांनी आढावा घेतला. लसीकरण सेंटरबाबतही त्यांनी माहिती घेतली. तसेच शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरची नायर व अधिकाऱ्यांनी पाहणी करून तेथील कोरोनाच्या रुग्ण सुविधेबाबत आढावा घेतला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग