शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बालपणीचा प्रवास उलगडताना डॉ.माशेलकर झाले भावनिक, आठवणींना दिला उजाळा

By अनंत खं.जाधव | Updated: December 20, 2023 16:32 IST

सावंतवाडी : एखादा माणूस मोठा होतो पण तो कधी आपले बालपण विसरत नाही म्हणतात ना ते खोटे नाही, याचाच प्रत्यय ...

सावंतवाडी : एखादा माणूस मोठा होतो पण तो कधी आपले बालपण विसरत नाही म्हणतात ना ते खोटे नाही, याचाच प्रत्यय थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आला. समोरच्या विद्यार्थ्याचे बालपण बघून डॉ.माशेलकर यांनाही आपले बालपण आठवले आणि त्यांनी जुन्या आठवणीना उजाळा देत आपले बालपण विद्यार्थ्यांसमोर उलगडले.आठवणींना उजाळा देताना आपल्या घरची हालखीची परिस्थिती,  दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत अनवाणी चालावं लागलं असे सांगत डॉ.माशेलकर भावनिक झाले. मात्र स्वत:ला सावरत आपल्या आईने परिस्थिती समोर हात न टेकता जिद्द सोडली नाही आणि महत्त्वाचे म्हणजे मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आईने सांगितले विज्ञानाचा वापर गरिबांसाठी कर. वाचनाचा सल्ला दिला तसेच विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे असेही ते म्हणाले.जातीपातीच्या भिंती तोडून एकत्र यायला हवंतंत्रज्ञानाच्या युगात आताची मुलं वाचनात कुठेतरी कमी पडतात अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त वाचावं अस आवाहनही केलं. आपण कुठं जन्मलो याला महत्त्व नाही. श्रीमंत शिक्षण मिळाले तर आपले विचारही श्रीमंत होतात. त्यामुळे शालेय शिक्षण खूप महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्या भिंती तोडून आपण एकत्र  यायला हवं. आपण आपल्यातील संवाद हरवत चाललो आहोत. संवादाने अनेक प्रश्न सुटू शकतात. वाद टाळता येऊ शकतात असेही ते म्हणाले. हळदीच्या पेटंटसाठी अमेरिकेच्या विरोधात दिलेला लढा, बसुमाती तांदळाच्या पेटंटच्या बाबतीतले अनेक किस्से, विविध परिषदा, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि कौटुंबिक घटना याबाबतीतले अनेक किस्से त्यांनी सांगितले. माध्यम सल्लागार जयु भाटकर यांनी डॉ.माशेलकर यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, चेअरमन अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, व्यवस्थापकिय समन्वयक  सुनेत्रा फाटक, प्राचार्य डॉ. विजय जगताप, प्राचार्य डॉ. रमण बाणे,उपप्राचार्य गजानन भोसले, प्राचार्य सत्यजित साठे उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग