शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

ज्यात-त्यात अभियान -

By admin | Updated: March 18, 2016 23:20 IST

कोकण किनारा

सरकारी यंत्रणा असो किंवा सर्वसामान्य माणसे असोत, आपली कामे नियमित वेळेत किंवा नियमात करत नसल्यानेच आता प्रत्येक गोष्टीसाठी अभियान राबवण्याची वेळ आली आहे. पाहावे तेव्हा कुठले ना कुठले अभियान सुरू होत असते. राजकारणी लोक त्या अभियानाचे उद्घाटन करतात, काही दिवस त्यावर चर्चा होत राहतात आणि आपण पुन्हा दुसऱ्या अभियानासाठी सिद्ध होतो. कुठल्याही विकासासाठी किंवा प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाची गरज आहे ती जागरूक समाजाची. दुर्दैवाने आपल्याकडे त्याचाच अभाव आहे. श्रीमंत माणसांची अजून श्रीमंत होण्याची आणि गरीब माणसांची दोनवेळचे पोट भरण्याची स्पर्धा दिवस-रात्र सुरू आहे. त्यामुळे समाज म्हणून विचार करण्यास कोणालाही वेळ नाही. म्हणूनच पाणी वाचवण्यासाठी जल अभियान सुरू करण्याची वेळ सरकारवर आली आहे. सरकार आणि जनता दोघेही निद्रिस्त असल्याने प्रगतीचा गाडा तसूभरही पुढे सरकत नाही, हे आपल्या समाजाचे चित्र आहे.कधी पहावे तर एस्. टी.चा सौजन्य सप्ताह असतो, कधी सुरक्षा सप्ताह असतो. ज्या गोष्टी नियमित होणे अपेक्षित आहे, त्या गोष्टींसाठी फक्त सप्ताह का पाळावे लागतात, हा प्रश्नच आहे. एस. टी. असो किंवा कोणतीही सार्वजनिक व्यवस्था असो तिथे कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्याशी संबंध येणाऱ्या ग्राहक/प्रवाशांनी एकमेकांशी सौदार्हपूर्ण व्यवहार करणे कायमच अपेक्षित आहे. त्यासाठी सप्ताहाची गरज काय? रस्त्यावरील सुरक्षित प्रवासासाठी सप्ताह कशासाठी? वाहन चालवताना स्वत:ची आणि आपल्याबरोबरच इतरांचीही काळजी तितक्याच प्राधान्याने घेणे गरजेचे आहे. औद्योगिक सुरक्षा सप्ताह असेल, आरोग्य सप्ताह असेल, असे सप्ताह करण्याची वेळ का यावी? औद्योगिक क्षेत्रात कायमची सुरक्षितता पाळली गेली तर त्यातून अनेक कर्मचाऱ्यांचे जीव वाचणार नाहीत का?आता नव्याने सुरू झाला आहे तो, जलजागृती सप्ताह. त्याचीही जागृती करावी लागते, ही बाब खटकणारी तर आहेच, पण त्याचबरोबर लाजीरवाणीही आहे. दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. अनेक उपाययोजना राबवूनही उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी कमी होत जाते. अगदी मोठ्या शहरातही एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. टँकर गावात जातो तेव्हा रिकामे हंडे, कळशा, बादल्या त्यांची वाटच पहात असतात. अशी परिस्थिती प्रत्यक्ष आपल्या स्वत:वर आली नाही, तरी त्याची कल्पना आपल्याला असते. आपल्या आसपासच्या अनेक भागांमध्ये आपले मित्र, नातेवाईक अशा परिस्थितीला सामोरे जात असल्याचेही आपल्याला माहिती असते. पण तरीही आपल्याला पाण्याचे महत्त्व सांगावे लागते. जलजागृती अभियान राबवावे लागते.ही असली अभियाने राबवण्याची वेळ सरकारवर येते, याला कारण समाज खूप आत्मकेंद्री झाला आहे. आपल्यापलिकडे पाहण्याची वृत्तीच नाहीशी झाली आहे. मी आणि माझा परिवार एवढीच आपली संकल्पना झाली आहे. ‘मला पुरेसे पाणी आहे ना?’, ‘माझ्या विहिरीत भरपूर पाणी आहे मग मी पाण्याचा जास्त वापर केला तर काय झाले?’, ‘मी पाणी वापरले नाही तर दुसरा कोणीतरी वापरणारच आहे. मग मी का वापरू नये?’, अशा प्रकारची अनेक विधाने स्पष्टीकरण म्हणून ऐकायला मिळतात, तेव्हा हेच लक्षात येते की, आपण फक्त आत्मकेंद्री आहोत.खरेतर सरकारने राबवलेले प्रत्येक अभियान हे कसे वागावे, याचे धडे देणारे आहे. असे धडे आपल्या समाजाला द्यावे लागतात, हेच दुर्दैव आहे. पाण्याचा वापर कसा करावा? किमान पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा वापर कसा करावा, हे आपल्याला सांगायची वेळ का यावी? वाहन चालवताना स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या, हे सांगण्यासाठी अभियान का राबवावे लागते? समाज साक्षर होत चालला असला, तरी सुशिक्षितपणाचे स्थानक अजूनही खूप लांब आहे, असेच यावरून दिसते. खरेतर सर्वसामान्य किंबहुना आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरावरील लोकांमध्ये अशा प्रकारच्या जागृतीची गरज नसते. कारण अशा लोकांकडे पाण्याची उपलब्धताच मुळात कमी असते. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची वेळ त्यांच्यावर नेहमीच असते. पाण्याचे मोल त्यांना सांगावेच लागत नाही. ही वेळ येते उच्च आर्थिक स्तरातील लोकांसाठी. पाण्याचा अतिवापर हा त्याच वर्गात अधिक होतो. अपार्टमेंट संस्कृतीत तर पाण्याच्या वापराला खूपदा निर्बंध राहत नाहीत. सोसायटीचे पाणी मी वापरले नाही तर दुसरा कोणीतरी वापरेलच, अशी भावना अनेकांच्या मनात असते. मुळात सुधारणा आपल्या प्रत्येकामध्ये होणे गरजेचे आहे. चांगल्या वर्तणुकीसाठी सरकारकडून अभियान राबवण्याची वेळ येऊ नये. अशी अभियाने म्हणजे सरकारी अधिकारी-कर्मचारी यांचा वेळ घालवणारी असतात. या अभियानांच्या जाहिरातीवर सरकारचा मोठा पैसा खर्च होतो. त्याच्या कार्यक्रमांवर मोठा खर्च होतो. हा सगळा तुमचा आमचाच पैसा आहे. अशा अभियानांमधून काही लोकांचे उखळ पांढरे होते, हा भाग वेगळाच. पण योग्य वागण्याची शिकवण देणारी अभियाने राबवायची वेळ सरकारवर येणे ही बाबच आपल्या अशिक्षितपणावर शिक्कामोर्तब करते. अशा अभियानांचे फलित काय, हा तर स्वतंत्र स्तंभाचा आणि संशोधनाचाच विषय!मनोज मुळ््ये