शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

सिंधुदुर्गातील बंद पडलेले चिपी विमानतळ नियमित केव्हा सुरू होणार ?; पंतप्रधान यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये होता समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:44 IST

पर्यटनावर दूरगामी परिणाम

रजनीकांत कदमकुडाळ : गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या चिपी विमानतळावरून नियमित विमान वाहतूक सेवा केव्हा सुरू होईल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण गेले अनेक महिने या विमानतळावरून विमानसेवा नियमित सुरू नाही आहे. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी म्हणजे तीन महिन्यांपूर्वी येथे विमानसेवा देणाऱ्या अलायन्स एअरचा तीन वर्षांसाठीचा ठेका संपला. त्यानंतर मुंबईकडे जाणारी विमानसेवा बंद करण्यात आली असून त्याचा फटका प्रवाशांना आणि चाकरमान्यांना बसत आहे.सिंधुदुर्ग देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर  येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. रेल्वे सेवेबरोबरच या जिल्ह्यात ठिकाणी वेंगुर्ला तालुक्यातील परुळे चिपी येथे विमानतळ करण्याचे निश्चित झाले. अनेक वर्षे या विमानतळाचे काम सुरू होते. काही वर्षांनी का होईना पण या विमानतळाचे उद्घाटन तीन वर्षांपूर्वी झाले. अलायन्स एअरची सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमानसेवा सुरू झाली.नियमित प्रवाशांसह, पर्यटकांचाही प्रतिसाद

  • दि. ९ ऑक्टोबर २०२१ पासून चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबईदरम्यान अलायन्स एअरची उड्डाणे सुरू झाली. याचा पर्यटकांना तसेच स्थानिक आणि व्यावसायिक दोघांनाही पर्यटकांना तसेच स्थानिक आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा फायदा झाला.
  • या तीन वर्षांत पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या या हवाई सेवेला देश-विदेशातील नियमित स्थानिक प्रवासी आणि पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद  दिला आहे.

पंतप्रधान यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये समावेशपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील उड्डाण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात विमान प्रवास सोपा झाला होता.

पर्यटनावर दूरगामी परिणामअलायन्स एअर या विमान कंपनीने त्यांचा करार संपल्याने दि. २६ ऑक्टोबर २०२४ पासून आपली उड्डाणे बंद करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही कोकण जिल्ह्यांतील पर्यटन व्यवसायावर याचा विपरीत परिणाम आणि दूरगामी परिणाम निश्चित झाला.

प्रवासी वाढू शकतातया ठिकाणी अविरत विमानसेवा सुरू केल्यास निश्चितच या विमानतळावरून प्रवाशी मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. त्यातच पर्यटनाच्या हंगामात, गणेशोत्सव, होळी सण आणि इतर सण, उत्सवाच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी याठिकाणी या विमानातून मुंबईकडे जात येत होते.

तीन वर्षांचा करार संपला

  • अलायन्स एअर या कंपनीमार्फत चिपी ते मुंबई आणि मुंबई ते चिपी या मार्गावर विमान सेवा सुरू करण्यात आली होती. ही सेवा तीन वर्षांच्या करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. आता ही मुदत २६ ऑक्टोबर २०२४ रोजी संपली आहे.
  • अलाईन्स एअरची चिपी मुंबई विमानसेवा बंद होऊन काही महिने झाले. त्या पाठोपाठ फ्लाय ९१ च्या हैदराबाद व बेंगलोर सेवाही बंद झाल्या. अलीकडेच सुरू झालेली पुणे ते चिपी ही आठवड्यातून अनियमित व वारंवार खंडित होती.
  • या विमानतळावरून पुन्हा विमानसेवा नियमित सुरू करण्यात यावी अशी मागणी होत असून राज्यात महायुती व केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे हे विमानतळ सुरू करण्यासाठी येथील आमदार, मंत्री, खासदार यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAirportविमानतळprime ministerपंतप्रधान