शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना लाभ केव्हा मिळणार, कर्जमाफी याद्या अपलोड करण्यातच अडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 13:02 IST

कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतक-यांच्या याद्या शासनाच्या ‘आपले सरकार पोर्टल’वर अपलोड करण्याचे काम सुरू असतानाच

सिंधुदुर्गनगरी : कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतक-यांच्या याद्या शासनाच्या ‘आपले सरकार पोर्टल’वर अपलोड करण्याचे काम सुरू असतानाच ‘महा आॅनलाईन’च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (सीएसएमएसएसवाय) या नवीन ‘पोर्टल’वर पुन्हा नव्याने याद्या ‘अपलोड’ करण्याचे बँकांना निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार पुन्हा शेतक-यांच्या याद्या नवीन ‘पोर्टल’ वर अपलोड करण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले. याद्या ‘अपलोड’ करण्याचे घोंगडे भिजतच असल्याने, कर्जमाफीस पात्र शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या ‘आपले सरकार’ या ‘पोर्टल’वर अपलोड करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत गत महिनाभरापासून सुरू करण्यात आले आहे. कर्जमाफीस पात्र सर्व शेतकºयांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, शासनाच्या ‘महा आयटी’ विभागामार्फत शेतकºयांच्या ‘ग्रीन’ याद्या बँकांना प्राप्त होतील आणि त्यानंतर शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या ‘आपले सरकार’ या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याचे काम सहकारी संस्था व  बँकांमार्फत पूर्ण करण्यात आले. शेतकºयांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू असतानाच कर्जमाफीस पात्र शेतकºयांच्या याद्या ‘महाआॅनलाईन’च्या ‘सीएसएमएसएसवाय’ या ‘पोर्टल’वर पुन्हा नव्याने ‘अपलोड’ करण्याचे निर्देश शासनाच्या महा-आयटी विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले. त्यानुसार पुन्हा नव्याने नवीन पोर्टलवर कर्जमाफीस पात्र शेतकºयांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम १५ नोव्हेंबरपासून बँकांमार्फत सुरू करण्यात आले. शेतकºयांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे घोंगडे भिजतच असल्याने कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार केव्हा? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.