शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

विकासाच्या घोषणाशिवाय काय केले?, रूपेश राऊळांचा मंत्री केसरकरांना सवाल 

By अनंत खं.जाधव | Updated: March 17, 2023 17:44 IST

जनतेला फसवणाऱ्या केसरकरांचा पराभव हेच ध्येय

सावंतवाडी : कोणतेही सरकार आले तरी रस्ते पाणी हा विकास होतच राहतो. पण तुम्ही मंत्री होऊन आठ महिने झाले एक तरी भरीव विकास काम दाखवून द्या. मल्टिस्पेशालिटी रूग्णालय तसेच सुरक्षा मंडळ, बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी, बस स्थानक यांचे काय झाले. येथील जनतेने विकासाच्या नावावर गप्पा ऐकायच्या का? असा सवाल शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री दीपक केसरकर यांना केला आहे.येत्या आठ दिवसात केसरकर यांच्या विकास कामांचा पंचनामा करू अन्यथा रस्त्यावर उतरू. जनतेला फसवणाऱ्या केसरकरांचा पराभव हेच ध्येय असल्याचे राऊळ यांनी सांगितले आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, रश्मी माळवदे, सुनिता राऊळ, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.राऊळ म्हणाले, खोटं-नाटं करून मंत्रिपदे मिळविलेल्या केसरकरांनी गेल्या पंधरा वर्षात काहीही केले नाही. उलट आमदार नाईक यांनी मंत्री पदाची अपेक्षा न ठेवता बरीचशी विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन केसरकारांनी आता तरी आपल्या मतदारसंघाचा विकास करावा, केसरकारांनी केवळ भूमिपूजनाचे नारळ फोडले मात्र सुरू केलेली सर्व विकास कामे अर्धवट ठेवली आहेत. येथील बस स्थानकाचे काम २०१७ पासून सुरू आहे. मात्र आजही ते पूर्ण होऊ शकले नाही. तर दुसरीकडे नाईक यांनी आपल्या मतदारसंघातील कुडाळ, ओरोस आणि मालवण येथील बस स्थानकाची कामे जलद गतीने मार्गी लावल्याचे राऊळ म्हणाले.स्व:ता कसला विकास केला नाही, आणि दुसऱ्यालाही करू दिला नाही. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी येथील मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी चार बैठका बोलावल्या होत्या. मात्र केसरकरांच्या श्रेय घेण्याच्या बालिश हट्टामुळे या बैठका झाल्या नाहीत. खासदार विनायक राऊत सुद्धा जन हिताचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळी केसरकर यांनी आपल्या मतदारसंघात कोणी ढवळाढवळ करू नये, असे सांगून खो घातला. स्वतः काही करायचे नाही, आणि दुसऱ्यालाही काही करू द्यायचे नाही, ही केसरकर यांची नियत राहिली आहे. आणि त्याचा फटका सर्व सामान्य माणसाला बसत असल्याचे राऊळ म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाDeepak Kesarkarदीपक केसरकर