शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांसोबत घडलेला प्रकार संतापजनक, कणकवलीत शिवसेनेचे आंदोलन; सरकारचा केला निषेध

By सुधीर राणे | Updated: June 12, 2023 17:40 IST

कणकवली : श्री क्षेत्र आळंदी येथे दिंडी सोहळ्यासाठी आलेले वारकरी अन्  पोलिसांच्यात झालेली झटापट ही घटना संतापजनक आहे. याप्रकरणी दोषींची चौकशी करुन ...

कणकवली : श्री क्षेत्र आळंदी येथे दिंडी सोहळ्यासाठी आलेले वारकरी अन् पोलिसांच्यात झालेली झटापट ही घटना संतापजनक आहे. याप्रकरणी दोषींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाच्यावतीने करण्यात आली. सोमवारी कणकवली तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार आर.जे.पवार यांना निवेदनही  देण्यात आले. 

या आंदाेलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन अनेकांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. टाळ, मृदंगाच्या गजरात मोर्चा कणकवली तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हा प्रमुख सुजित जाधव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राणे, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, तेजस राणे, कन्हैया पारकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, सचिन सावंत, रुपेश आमडोसकर, मंगेश सावंत, सचिन आचरेकर, तानाजी कांबळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता.आमदार वैभव नाईक म्हणाले, आम्ही शिंदे-फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो. आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या दरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिर प्रवेशावरुन वाद उपस्थित झाला होता.  त्याही पुढे जाऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांसोबत पोलिसांची झटापट झाली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने थोडी तरी लाज बाळगावी. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी असे सांगितले.सतीश सावंत व संदेश पारकर यांनी मनोगत व्यक्त करताना याप्रकरणी संबंधितावर कारवाई न झाल्यास भविष्यात जनआंदोलन उभारणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022PoliceपोलिसShiv Senaशिवसेना