शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यास भाजप सक्षम, राजन तेलींचे प्रत्युत्तर 

By अनंत खं.जाधव | Updated: October 28, 2023 16:50 IST

सावंतवाडी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाजपचे नेते रोजगारच्या मुद्द्यावर संवेदनशील ...

सावंतवाडी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाजपचे नेते रोजगारच्या मुद्द्यावर संवेदनशील आहेत. आडाळीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून चांगले उद्योग येत आहेत. राज्य सरकारकडून देखील प्रयत्न सुरु आहेत असे असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यात नाहक वातावरण बिघडू नये सल्ला माजी आमदार राजन तेली यांनी दिला आहे. चार वेळा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी कोकणासाठी काय केले असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.तेली म्हणाले, भाजप कडून रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले आहे मात्र शहरांतल्या अर्चना घारेनी आदी गावं आणि गावाचे प्रश्न समजून घ्यावेत. लोकांच्या ओळखी वाढवाव्यात. नंतर टीका करावी तब्बल ६३ वर्षे राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आहे तर पक्षाध्यक्ष शरद पवार हे तब्बल ४ वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत, असे असताना त्यांनी राज्यासाठी आणि पर्यायाने कोकणासाठी नेमके काय केले..? याचे उत्तर द्यावे.महाविकास आघाडीची सत्ता असताना दोडामार्ग तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न अर्चना घारेनी किती वेळा मांडला? आडाळी एमआयडीसीचा मुद्दा त्यांना महत्वाचा वाटला नाही. आता निवडणुक लढवायची आहे म्हणून जनतेला गाजर दाखवायचे उद्योग करु नका. कारण महाविकास आघाडीने आडाळी एमआयडीसीला कधीच महत्व दिल नाही. उद्योग आणण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत, याची जाणीव स्थानिकांना आहे. आघाडी शासनात राष्ट्रवादीच्याच आदिती तटकरे या उद्योग खात्याच्या राज्यमंत्री होत्या, हे अर्चना घारे यांना माहिती नव्हतं कां? त्यावेळी स्वतःच्या पक्षाकडे उद्योगमंत्रीपद असताना आडाळी एमआयडीसी त्यांना दिसली नाही. आणि आता भाजपने एमआयडीसीचा मुद्दा लावून धरल्यावर त्यांना रोजगाराचा प्रश्न दिसू लागला.भाजपवर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेच्या हस्ते विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना किट वाटप केले, हा विरोधाभास कशाला मग? केंद्रातील योजनाचा लाभ मिळवून देताना भाजपवर टीका करतात, हा दुटप्पीपणा जनतेला कळतो, याचं भान अर्चना घारेनी ठेवाव. अजित पवार बाहेर पडल्यानेच पवार कुटूंबाला उर्वरित राज्य दिसू लागले. अन्यथा बारामती च्या विकासापलीकडे त्यांनी कधी विचार देखील केला नाही.अशी टीका तेली यांनी यावेळी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस