शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत वीज वाहिन्यांबाबत नाईकांनी काय केले ?: बंडू हर्णे यांचा प्रतिप्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 11:44 IST

कणकवली शहरासाठी सन २०१५-१६मध्ये भूमिगत वीज वाहिनी मंजूर झाली. त्यावेळी नगरसेवक सुशांत नाईक आणि त्यांचे सहकारी सत्तेत होते. या सत्ता काळात जनतेबाबत खूप आस्था असल्याचे दाखविणाऱ्या नाईक यांनी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी महावितरणला नाहरकत प्रमाणपत्र का दिले नाही ? असा प्रतिप्रश्न नगरसेवक बंडू हर्णे यांनी विचारला आहे.

ठळक मुद्देभूमिगत वीज वाहिन्यांबाबत नाईकांनी काय केले ?: बंडू हर्णे यांचा प्रतिप्रश्नरेल्वे स्टेशन उद्यान कधी उभारणार

कणकवली : कणकवली शहरासाठी सन २०१५-१६मध्ये भूमिगत वीज वाहिनी मंजूर झाली. त्यावेळी नगरसेवक सुशांत नाईक आणि त्यांचे सहकारी सत्तेत होते. या सत्ता काळात जनतेबाबत खूप आस्था असल्याचे दाखविणाऱ्या नाईक यांनी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी महावितरणला नाहरकत प्रमाणपत्र का दिले नाही ? असा प्रतिप्रश्न नगरसेवक बंडू हर्णे यांनी विचारला आहे.तसेच ही योजना राबविताना रस्त्याची खोदाई करून भुमीगत वीज वाहिनी टाकण्यात येणार होती. भविष्यात शहरातील रस्ता रुंदीकरण करताना त्याची अडचण होईल. त्यामुळे या वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी त्यावेळी होणारा खर्च महावितरणने करावा व तसे हमीपत्र आता द्यावे, अशी मागणी केल्यानंतर महावितरणने ते दिले नाही.

त्यामुळे नाहरकत देण्यात आलेली नाही. मात्र , त्या निधीतून सुशांत नाईक यांनी महाडीक कंपाऊंड जवळ ट्रान्सफार्मर बसवून स्वत:चा पाच लाखांचा फायदा करून घेतला आहे. असा आरोपही बंडू हर्णे यांनी यावेळी केला.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अ‍ॅड. विराज भोसले, माजी बांधकाम सभापती अभिजित मुसळे, अजय गांगण, किशोर राणे, राजू गवाणकर आदी उपस्थित होते.बंडू हर्णे म्हणाले, सुशांत नाईक हे स्वतः खासदार विनायक राऊत यांचे विश्वासू कार्यकर्ते असल्याचे समजतात. मात्र, त्यांनी कणकवली शहरातील रेल्वेस्टेशन जवळील उद्यान व नगरपंचायतला नवीन ट्रॉलीसह ट्रॅक्टर देण्यासाठी ११ आॅगस्ट २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत ठराव घेतला होता. त्याला तीन वर्षे होऊन गेली . मात्र, त्याबाबत सुशांत नाईक यांनी किती पाठपुरावा केला.

या भूमिगत विजवाहिनीच्या कामासाठी खासदारांनी निधी आणला, असे सांगणाऱ्या सुशांत नाईक यांनी आपण सत्तेत असताना पाठपुरावा करून हे काम मार्गी लावण्याची गरज होती. पण तसे झाले नाही. हे त्यांचे अपयश आहे.आम्ही सत्तेत आल्यावर गेल्या दीड वर्षात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत ४ ते ५ वेळा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये योजना राबविण्यासाठी नाहरकत दाखला देण्यापूर्वी पुढील काळात नगरपंचायतची नुकसानी होऊ नये म्हणून हमीपत्राची मागणी केली होती. त्याची पुर्तता अद्यापही महावितरणने केली नसल्याने हा निधी मागे गेला आहे़. मात्र , या योजनेतून कणकवली शहरात १२ ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत.सुशांत नाईक ज्यांच्या संगतीला लागले आहेत त्यांनी शहरामध्ये आतापर्यंत फक्त वाद लावण्याचे काम केले आहे. जे लोक मागच्या दाराने नगरपंचायतमध्ये आले आहेत त्यांच्या सांगण्यावरून सुशांत नाईक चुकीच्या पध्दतीने प्रसिद्धी माध्यमाना माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप ओढून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.ज्या सावंतवाडी नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता चार वर्षे होती़ .त्या ठिकाणचा भूमिगत वीज वाहिन्यांचा निधी सुद्धा त्या वेळच्या पालकमंत्री आणि विनायक राऊत यांच्या आपापसातील वादामुळे परत गेला आहे.

यापूर्वी त्या दोघांमध्ये वाद असल्याचे आम्ही फक्त ऐकून होतो. मात्र, आमच्यावर टिका करून नाईक यांनी ते अधोरेखित केले आहे. त्यामुळे आमच्यावर व आमदार नितेश राणेंवर टीका करण्यापूर्वी नाईक यांनी आधी त्याचा विचार करावा. निधी आला पण सुशांत नाईक यांना त्यांच्या सत्ता काळात पाठपुरावा करता आला नसल्याने तो निधी खर्च होऊ शकलेला नाही.मालवण येथे भूमिगत विजवाहिन्यांचे काम सुरू असून तिथे स्क्वेअर रनिंग मिटरचा दर १४३५ रूपये असताना तो ९२५ रुपये असल्याचे सांगून खोटी आकडेवारी नाईकांनी दिली आहे. या कामासाठी आमचा दर २३०० रूपये व सावंतवाडीचा २५०० रूपये होता. याची माहिती नाईक यांनी आधी घ्यावी आणि नंतरच वक्तव्य करावे.या दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा . आम्हाला तो मान्य असेल. असे आम्ही सांगूनही महावितरणने त्याबाबत काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे हा निधी मागे गेला आहे. तरीही भूमिगत वीज वाहिन्यांसाठी पुन्हा निधी मिळावा यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आमचे प्रयत्न राहतील, असा विश्वास बंडू हर्णे यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग