शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

WELCOME KONKAN : सिंधुदुर्ग : नव्या वर्षाचा सेलिब्रेशन करायचंय ? चला तर मग थेट कोकणात, पर्यटनाचे नवे अध्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 14:44 IST

सरत्या वर्षाला निरोप द्यायचाय ?....नव्या वर्षाचा सेलिब्रेशन करायचंय ? चला तर मग थेट कोकणात.....येवा कोकण आपलाच आसा ! असे आदरातिथ्याने म्हणणारा कोकणी माणूस यावर्षीच्या नव्या सेलिब्रेशनसाठी आतुर झालाय. समुद्राच्या तळाखालील अद्भुत विश्वही पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देपर्यटन करताना जीव सांभाळातारकर्ली, देवबागही सज्जसफर सी वॉटर पार्कचीमज्जा लुटण्यासाठी बरेच पर्यायमालवणनगरी ५ जानेवारीपर्यंत हाऊसफुलसुविधायुक्त उडन हाऊससेलिब्रेशनची धूम

सिद्धेश आचरेकरमालवण : सरत्या वर्षाला निरोप द्यायचाय ?....नव्या वर्षाचा सेलिब्रेशन करायचंय ? चला तर मग थेट कोकणात.....येवा कोकण आपलाच आसा ! असे आदरातिथ्याने म्हणणारा कोकणी माणूस यावर्षीच्या नव्या सेलिब्रेशनसाठी आतुर झालाय. कोकण म्हटल तर अथांग समुद्रकिनारे आणि मनमोहन निसर्ग सौंदर्य हे आलेच.

अलीकडे या दोन कोकणच्या सौंदर्यासह समुद्राच्या तळाखालील अद्भुत विश्वही पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच लाखो पर्यटकांचा ओढा थेट कोकणात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणनगरीत असतो.

आॅक्टोबर महिन्यापासून सुरु झालेला पर्यटन हंगाम डिसेंबर महिन्यात चांगलाच बहरतो. सरत्या वर्षाला ह्यगुड बायह्ण आणि नूतन वर्षाला वेलकम करण्यासाठी पर्यटकांनी मागील दहा वर्षात मालवणला सर्वाधिक पसंती दिली आहे. पर्यटनाची नवनवी आव्हाने झेलणारे पर्यटन व्यावसायिकही पर्यटकांना खुष करण्यासाठी पर्यटन व्यवसायात नवनवे अध्याय आणत असून पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरतात हे विशेष.

सेलिब्रेशनची धूमसरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटकांनी मालवण किनारपट्टीला सर्वाधिक पसंती दिली आहे. पर्यटन महामंडळाची तारकर्ली एमटीडीसी ५ जानेवारीपर्यंत आगाऊ बुकिंगसह फुल झाली आहे. तारकर्ली, देवबाग, वायरी, दांडी चिवला व तळाशील-तोंडवळी किनारपट्टीवरील हॉटेलमध्येही पर्यटकांनी आगाऊ बुकिंग सुरु केले आहे. कृषी व धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणाºया पर्यटकांच्या स्वागतासाठी मालवण सज्ज झाले आहे.

सुविधायुक्त उडन हाऊसकोकण किनारपट्टीवरील पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून मालवणला पर्यटकांकडून सर्वाधिक पसंती दिली जाते. लाखोंच्या संख्येने मालवणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. राज्याबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत.

सीआरझेड कायद्यामुळे किनारपट्टी भागात बांधकामांवर येणारे निर्बंध लक्षात घेता उडन हाऊस या संकल्पनेतून अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त पर्यटन हाऊसची उभारणी केली असून पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत. अनेकांनी आपल्या हॉटेलमध्ये दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला आहे.

मालवणनगरी ५ जानेवारीपर्यंत हाऊसफुलतारकर्ली एमटीडीसी १७ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत फुल झाली आहे. येथील २२ तंबू निवास व कर्ली खाडीतील दोन हाऊसबोट यांचा यात समावेश आहे. अनेक हॉटेलमध्ये आगाऊ बुकिंगची नोंद सुरु आहे. काही ठिकाणी पर्यटकांना विशेष पॅकेज दिली जात आहेत.

आॅनलाईन पद्धतीने बुकिंग करुन आगाऊ रक्कमही पर्यटकांकडून जमा केली जात आहे. मालवण पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी पर्यटन हंगामात शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्याकडे जादा पोलीस कुमक देण्याची मागणी केली आहे. प्रमुख मार्गावर वाहतूक पोलीस तैनात केले जाणार आहेत.

मज्जा लुटण्यासाठी बरेच पर्यायमालवणला आल्यानंतर कोणताही पर्यटक हमखास किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन घेतोच. त्यानंतर पर्यटकांच्या पर्यटनाला सुरुवात होते. मग त्याच्यासाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी नवनवे पर्यटन व्यवसाय सुरु केले आहेत. यात प्रामुख्याने वॉटरस्पोर्ट्स, पॅरासेलिंग, बोटिंग व स्कुबा डायव्हिंग या पर्यटन प्रकारांचा समावेश आहे.

मालवण, चिवला बीच, तारकर्ली खाडी, देवबाग आदी ठिकाणी पर्यटकांचीही मागील पाच ते सहा वर्षात सर्वाधिक पसंती राहिली आहे. गतवर्षी नोटाबंदीचा फटका पर्यटन व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला होता. तरीही नोटाबंदीच्या ग्रहणाला तोंड देत गतवर्षी व्यावसायिकांनी सी फूड फेस्टिवलचे आयोजन करून पर्यटकांना पुन्हा मालवणकडे वळते करून घेतले. याही वर्षी तुमचा मालवणलाच यायचा बेत असेल तर तुम्हाला फूड फेस्टिवल तसेच बीच फेस्टिवल, म्युझिकल नाईट आदी पर्याय उपलब्ध असणार आहेत.

सफर सी वॉटर पार्कचीपर्यटन व्यावसायिकांनी स्कुबा डायव्हिंगसारख्या महागड्या व्यावसायानंतर पुढाकार घेवून धाडसाचे पाऊल टाकत उभारलेला सी वॉटर पार्क हा प्रकल्प यावर्षीपासून प्रथमच पर्यटकांच्या सेवेत दाखल झाला आहे. सी वॉटर पार्क या प्रकल्पामध्ये व्यावसायिकांनी ३५ ते ४० लाखापर्यंत गुंतवणूक केली आहे. सी वॉटर पार्कची उभारणी करत असल्यापासून पर्यटकांना त्याचे मोठे आकर्षण होते.

मागील आठवड्यापासून सी वॉटर पार्क पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी नवा अध्याय म्हणून समोर येत आहे. तुम्हाला पर्यटनाचे चक्र पूर्ण करायचे असेल तर सी वॉटर पार्क भेट देवून तेथील अविस्मरणीय आनंद द्विगुणित कराच ! माफक दर आणि सुरक्षित पर्यटन हे सी वॉटर पार्कचे वैशिष्ट्य असून बच्चे कंपनीसह मोठ्या व्यक्तिंना सी वॉटर पार्कमध्ये खेळण्याबागडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तारकर्ली, देवबागही सज्जपर्यटनात मालवणच्या साथीने देवबाग व तारकर्ली तसेच वायरी हे सागरी किनारपट्टीवरील गावही पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे धूमधडाक्यात स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत आगाऊ बुकिंग केले आहे.

अचानक मालवणच्या दौचा बेत आखला तर राहण्यासाठी हॉटेल्स मिळणे कठीण आहे. जवळपास सर्व हॉटेल्स, लॉजचे संकेतस्थळ उपलब्ध असल्याने पर्यटकांनी आॅनलाईन बुकिंगला महत्व दिले आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पाच दिवसात सुमारे ५० हजाराहून अधिक पर्यटक येतील, असा अंदाज पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

पर्यटन करताना जीव सांभाळापर्यटकांना समुद्रस्नानाची मोठी उत्सुकता असते. तारकर्लीसारख्या स्वच्छ व मनमोहक समुद्रकिनारी समुद्रस्नान करत असताना अतिउत्साहीपणामुळे आजवर अनेक पर्यटकांना जीव गमवावे लागले आहे. यात प्रामुख्याने युवा वर्गाचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी आपली स्वत:ची सुरक्षितता व खबरदारी घेवूनच जीवाचे पर्यटन करावे.

स्थानिक पर्यटनाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नका. स्थानिकांशी वाद न घालता येथील पर्यटकांचा आनंद लुटत राहा. सुरक्षित समुद्रकिनारी समुद्रस्नान केल्यास पर्यटन अधिक बहरेल. प्रशासनाच्या अनास्थेमुळे किनारपट्टीवरील गावात वैद्यकीय सुविधा नसल्याने पर्यटकांनी स्वत:च जीव स्वत:च सांभाळणे गरजेचे असून स्थानिकांना सहकार्य करावे, हीच अपेक्षा ! 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन