सावंतवाडी : युवतीच्या लंैगिक अत्याचार प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू असून आपण तपासकामावर समाधानी आहे. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी अधिकारी काम करतील, असे कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. त्यांनी आज, गुरुवारी रात्री उशिरा लंैगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासाची माहिती महिला तपासी अधिकारी जोत्स्ना भ्रमिष्टे यांच्याकडून घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक जगदीश शिंदे, सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक रणजित देसाई उपस्थित होते. यावेळी गुप्ता म्हणाले, कोकण विभागाचा प्रभार घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गमध्ये आलो असून, जिल्ह्यातील सागरी सुरक्षेला विशेष महत्त्व देणार आहे. सावंतवाडीत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, मी तपासी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला आहे. यातील आरोपींना कडक शिक्षा होईल, याची मी दक्षता घेईन, तशी सूचनाही अधिकाऱ्यांना दिली असून, सिंधुदुर्गचे वरिष्ठ अधिकारी यात योग्य प्रकारे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)वैद्यकीय अहवाल प्राप्तलंैगिक अत्याचार प्रकरणातील युवतीचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, तो अहवाल पुणे येथे पाठवण्यात येणार आहे. अहवालाबाबत अधिक माहिती देण्यास अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी नकार दिला. या प्रकरणात आतापर्यंत सहाजण आरोपी निष्पन्न झाले आहेत. मुलीने अजून कोणाची नावे दिली नाहीत. आम्ही आरोपीकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू
By admin | Updated: August 22, 2014 00:51 IST