शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

कबुलायतदार जमिनी हक्काबाबतचे  प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावू : अब्दुल सत्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:30 IST

AmboliHillStation, Land, AbdulSattar, Minister, sindhudurgnews जिल्ह्यातील चौकुळ, गेळे व आंबोली येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले कबुलायतदार जमिनी हक्काबाबतचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू. त्यासाठी शासन स्तरावर उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी येथे दिले.

ठळक मुद्देकबुलायतदार जमिनी हक्काबाबतचे  प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावू : अब्दुल सत्तार आंबोली येथे कबुलायतदार गावकर जमीन वाटप समितीची बैठक

आंबोली : जिल्ह्यातील चौकुळ, गेळे व आंबोली येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले कबुलायतदार जमिनी हक्काबाबतचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू. त्यासाठी शासन स्तरावर उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन महसूल राज्यमंत्रीअब्दुल सत्तार यांनी रविवारी येथे दिले.आंबोली येथे कबुलायतदार गावकर जमीन वाटप समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सावंतवाडी सहायक वनसंरक्षक आय. डी. जळगांवकर, दिगंबर जाधव, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महसूल राज्यमंत्रीअब्दुल सत्तार पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबुलायतदार गेली अनेक वर्षे जमीन हक्कासाठी शासनस्तरावर प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा अविरत लढा सुरूच असून हा लढा आता सत्यात उतरणार आहे. कबुलायतदारांचा हा प्रश्न निकाली निघाल्यानंतर त्यांच्या येणाऱ्या पिढीला ही बाब सुखकारक असणार आहे. त्यांचा हा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे.कबुलायतदार यांना जमिनीचे वाटप करताना कोणावरही अन्याय न होता समान पद्धतीने त्यांना न्याय दिला जाईल. शासन आपल्या दरबारी येऊन आपल्या सर्वच प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहे. यापुढेही कबुलयातदारांचे निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.जंगली प्राण्यांपासून उपद्रव टाळण्यासाठी उपाययोजनाकबुलायतदार यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री व उच्चस्तरीय अधिकारी यांची मंत्रालयात तातडीने बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असेही महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. तसेच या भागात जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होेते. यासाठी सध्या जे जमीन कसत आहेत त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही व्हावी व वनविभागाने जंगली प्राण्यांपासून होणारे उपद्रव टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे यावेळी सत्तार म्हणाले.अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार : केसरकरआमदार केसरकर म्हणाले, गेली कित्येक वर्षे चौकुळ, गेळे, आंबोली येथील कबुलायतदार प्रश्न प्रलंबित होता. आम्ही सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले. आता हा प्रश्न अंतिम टप्यात आला आहे. कबुलायतदार प्रश्न सोडविण्यासाठी उच्च स्तरावर सर्व प्रकारची कार्यवाही पूर्ण होत आली आहे. त्यामुळे कबुलायतदार हे जमिनीचे हक्कदार होणार आहेत.प्रश्न सुटल्यावर विविध योजनांचे, आपत्तीमुळे नुकसान झालेल्या त्यांच्या भरपाई बाबतचे लाभ त्यांना मिळण्यास ते पात्र होतील. तसेच इतर अनेक शासकीय योजनांचे लाभ संबंधिताना घेता येणार आहेत. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारministerमंत्रीAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग