शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
2
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
5
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
6
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
7
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
8
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
9
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
10
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
11
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्
12
प्रज्वल रेवन्ना भारतात येणार, बंगळुरूसाठी फ्लाइट तिकीट बुक!
13
"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग
14
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
15
थरार: गाढ झोपलेल्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
16
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
17
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
18
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
19
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
20
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या

आम्ही निष्ठेला जागणारे, पळपुटे आमदार नव्हे - वैभव नाईक 

By सुधीर राणे | Published: October 07, 2023 1:26 PM

भाजपच्या आमदारांनी २२०० कोटीचा निधी आणल्याचा फलक लावला, तो नेमका कोठे गेला?

कणकवली: भाजपच्या स्थानिक आमदारांनी २२०० कोटी रुपयांचा निधी आपण आणल्याचा फलक कणकवली  शहरात लावला आहे. तो निधी नेमका कोठे गेला. हे त्यांनी जनतेला सांगावे. असे सांगतानाच कोणत्याही आमिषाला बळी न पडता आम्ही निष्ठेला जागणारे आहोत, पळपुटे आमदार नाही,असे प्रतिपादन  ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केले.कणकवली येथे 'होऊ द्या..चर्चा अंतर्गत आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संपर्कप्रमुख अतुल रावराणे, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हासंघटक जान्हवी सावंत यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, जनतेच्या मनातील प्रश्नांची चर्चा करण्यासाठी शिवसेनेने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सत्तेत आल्यावर एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सामावून घेवू, मराठा तसेच धनगर समाजाला आरक्षण देवू असे सांगितले होते. त्याचे काय झाले? ..तर आरोग्य व्यवस्था सुधारली असतीसरकारी नोकर भरतीमध्येही खासगीकरण आणण्यासाठी सरकारने ९ कंपन्या नेमल्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये भाजपच्या आमदारांच्या जास्त कंपन्या आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून १ कोटी रुपये मंडप घालण्यासाठी देण्यात आले. त्या कार्यक्रमासाठी ९० लाख एसटी भाडे लागले. लोकांच्या आरोग्यासाठी हे २ कोटी वापरले असते तर आरोग्य व्यवस्था सुधारली असती. 'हे' उद्धव ठाकरे यांनी केलेले काम ओरोस जिल्हा रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषधे नाहीत. कोरोना काळात याच जिल्हा रुग्णालयात असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या सहाय्याने १२ हजार लोक बरे होवून गेले आहेत. त्यावेळी असलेली आरोग्य यंत्रणा चांगल्याप्रकारे हाताळली होती. हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले काम आहे.आता जनतेने विचार करावातलाठी परीक्षा भरती प्रक्रियेला पेपर फुटला ? त्यावेळीही मोठी आर्थिक देवाण घेवाण झाली. जिल्ह्यातील ४३४ शाळा बंद होणार आहेत. आम्ही आंदोलन केले, मंत्री सांगताहेत शिक्षक भरती करतो. मात्र, अद्याप शिक्षकांची भरती झालेली नाही. स्थानिक आमदार 'हिंदू खतरे मे है' असे सांगत फिरतात. मात्र सत्तेत हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. याचा विचार आता जनतेने करावा. गुरुनाथ खोत म्हणाले, देशातील सरकार लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालले आहे. गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारने लोकांना देशोधडीला लावले आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत हे सरकार बदलावेच लागेल. संदेश पारकर म्हणाले, भाजपच्या विरोधात जनतेच्या मनात चीड आहे. भाजपाने विविध घोषणा केल्या मात्र, पूर्ण केल्या नाही. तरुणांना रोजगार नाही. शिवस्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण नाही. महागाईचा आगडोंब उसळला आहे. हे केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश आहे. जिल्ह्यात ३० वर्षे राणेंची सत्ता आहे.त्यांनी जनतेसाठी काय केले? हे विचारावे लागेल. त्यामुळे या विधानसभा मतदासंघावर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागूया. यावेळी उपस्थित इतर मान्यवरानीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक BJPभाजपाShiv Senaशिवसेना