शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरस्पोर्ट्सला दोन ते तीन दिवसांत मंजुरी; अस्लम शेख यांची नारायण राणेंना ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 16:47 IST

Narayan Rane : सोमवारी रात्री उशिरा नारायण राणे यांनी याच विषयावर राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांच्याशी देखील दूरध्वनी वरून चर्चा करून या विषयावर तोडगा काढण्याची मागणी केली.

ठळक मुद्देया मागणीला अस्लम शेख यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत येत्या दोन ते तीन दिवसांत ही परवानगी देण्याची ग्वाही दिली आहे .

मालवण :  कोकण किनारपट्टीवरील वॉटरस्पोर्ट्सला लवकरच मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांना दिली आहे. किनारपट्टीवरील वॉटरस्पोर्ट्स पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याशी संपर्क केल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा नारायण राणे यांनी अस्लम शेख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत वॉटरस्पोर्ट्स तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती .

कोकणातील वॉटरस्पोर्ट्सला बंदर विभागाने परवानगी नाकारल्याने येथील व्यवसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मात्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या प्रश्नांची दखल घेण्यात येत नसल्याने शनिवारी नारायण राणे यांनी स्वतः याची दखल घेत राज्याचे मुख्य आयुक्त संजय कुमार आणि मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून वॉटरस्पोर्ट्सला तात्काळ परवानगी देऊन एसओपी जाहीर करण्याची सूचना केली होती.

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा नारायण राणे यांनी याच विषयावर राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांच्याशी देखील दूरध्वनी वरून चर्चा करून या विषयावर तोडगा काढण्याची मागणी केली. या मागणीला अस्लम शेख यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत येत्या दोन ते तीन दिवसांत ही परवानगी देण्याची ग्वाही दिली आहे .

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Malvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्ग