शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांत प्रथमच सावंतवाडीत पाणीटंचाई, कारण शोधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 16:51 IST

Sawatnwadi watershorteg Sindhudurg- गेल्या वीस वर्षांत सावंतवाडी शहरवासीयांना पाणीटंचाई भासली नव्हती. पण मागील तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीपुरवठा होत नसल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत योजना आखावी, अशी मागणी शहरातील सहा माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी जावडेकर यांनी सध्याच्या परिस्थितीत दिवसा दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देवीस वर्षांत प्रथमच सावंतवाडीत पाणीटंचाई, कारण शोधा सहा माजी नगरसेवकांची मागणी, मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट

सावंतवाडी : गेल्या वीस वर्षांत सावंतवाडी शहरवासीयांना पाणीटंचाई भासली नव्हती. पण मागील तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीपुरवठा होत नसल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत योजना आखावी, अशी मागणी शहरातील सहा माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी जावडेकर यांनी सध्याच्या परिस्थितीत दिवसा दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, संजय पेडणेकर, कीर्ती बोंद्रे, अफरोज राजगुरू उपस्थित होते, तर निवेदनावर माजी नगरसेविका साक्षी कुडतरकर व शुभ्रा सावंत यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.सावंतवाडी शहरामध्ये जानेवारीपासूनच पाणीटंचाई भेडसावत आहे.

पाणीपुरवठा योजनेमध्ये मुबलक पाणी असून, पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीटंचाई जाणवत असल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी केली. तर भोगटे यांनी चितारआळी, भटवाडी, वैश्य वाडा, उभाबाजार, सालईवाडा या भागात पाणी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली.

विलास जाधव यांनी मोर डोंगरी, गणेश नगर, सर्वोदय नगर, गरड तर उमाकांत वारंग यांनी खासकीलवाडा भागात पाणीपुरवठा योजना फुटली असल्याकडे लक्ष वेधले. अफरोज राजगुरू यांनी बुराण गल्ली, जुम्मा मशिदपर्यंत, तर कीर्ती बोंद्रे, विलास जाधव यांनी पाणीटंचाईबाबत लक्ष वेधले. सावंतवाडी शहरामध्ये एक वेळ पाणीपुरवठा असला तरी तो पुरेसा असावा याकडे या नगरसेवकांनी लक्ष वेधले. यापूर्वी अशी पाणीटंचाई जाणवली नसल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वीदेखील एकवेळ पाणीपुरवठा होत होतायावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर म्हणाले, शहरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून वेळापत्रक बदलले गेले. मात्र, आजच्या परिस्थितीत शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नाही. यावेळी पाणीपुरवठा अभियंता भाऊ भिसे यांनीदेखील शहरामध्ये जेथे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आहे, तेथे आम्ही जाऊन पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. पूर्वीदेखील एक वेळ पाणीपुरवठा होत होता याकडे लक्ष वेधले. 

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीwater shortageपाणीकपातsindhudurgसिंधुदुर्ग