कणकवली : वारकरी संप्रदायाचे काम उल्लेखनीय आहे. त्याचे कार्य अखंडपणे असेच सुरू राहो. समाजाला चांगल्या प्रकारे दिशादर्शन करण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत आहे. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असेप्रतिपादन शिवसेना नेते व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.हरकुळ खुर्द येथील टेंबवाडीमधील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. सतीश सावंत यांनी त्याठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत मनोगत व्यक्त केले.यावेळी वारकरी रघुजी रासम, रमाकांत गायकवाड, नामदेव दळवी, जिल्हा परिषद सदस्या राजलक्ष्मी डिचवलकर, उपसरपंच संजय रावले, विभागप्रमुख बंड्या रासम, अविनाश रासम, माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र डिचवलकर, उमेश घाडी आदी शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सतीश सावंत वारकऱ्यांबरोबर हातात टाळ घेऊन भजनात तल्लीन झाले होते. त्यांनी अनेक वारकऱ्यांचे आशीर्वाद यावेळी घेतले. तसेच वारकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.
वारकरी संप्रदाय करतोय समाजाला योग्य दिशादर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 11:34 IST
Kankavli Satish sawant sindhudurg वारकरी संप्रदायाचे काम उल्लेखनीय आहे. त्याचे कार्य अखंडपणे असेच सुरू राहो. समाजाला चांगल्या प्रकारे दिशादर्शन करण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत आहे. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
वारकरी संप्रदाय करतोय समाजाला योग्य दिशादर्शन
ठळक मुद्देवारकरी संप्रदाय करतोय समाजाला योग्य दिशादर्शन सतीश सावंत यांचे हरकुळ खुर्द येथे प्रतिपादन