शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुक्‍यातील ५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम सुरू, पुढील वर्षी होणार निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 13:24 IST

प्रभाग रचना ३१ डिसेंबरच्या ग्रामसभेमध्ये निश्चित करून प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत ही काढली जाणार आहे.

कणकवली : कणकवली तालुक्‍यातील ५८ ग्रामपंचायतीची मुदत पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. तत्पूर्वी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि प्रभाग निहाय आरक्षण जाहीर केले जाणार आहे. याची प्रक्रिया सध्या सुरू झाली असून अंतिम प्रभाग रचनेला २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत. प्रभाग रचना ३१ डिसेंबरच्या ग्रामसभेमध्ये निश्चित करून प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत ही काढली जाणार आहे.५८ ग्रामपंचायतींची ऑक्टोबर मध्ये मुदत संपणार !कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. या सरपंच आरक्षणा प्रमाणे ३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका गेल्या वर्षी झाल्या. मात्र, कोरोनाच्या कालावधी काही पोटनिवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. सध्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम हा मागील कार्यक्रमानुसार सुरू आहे. मात्र, तालुक्‍यातील ६३ पैकी ५८ ग्रामपंचायतीची  मुदत पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. त्यांच्या प्रभाग रचनेचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे.४९२ सदस्य निवडले जाणार !५८ ग्रामपंचायतीमध्ये ४९२ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. यासाठी १८८ प्रभाग रचना निश्चित केली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडून गुगल अर्थ द्वारे नकाशे तयार करण्यात आले आहेत. तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पाहणीतून प्रभाग रचना आणि सिमांकन तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रभाग रचना तपासणी करून गटविकास अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या समवेत हा कार्यक्रम निश्चित केला आहे. प्रभाग रचना प्रस्ताव हा १६ डिसेंबरला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी जाणार आहे. जिल्हाधिकारी यांनी नमुना व प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण संबंधी तपासणी करून आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर २१ डिसेंबरला मान्यता दिली जाणार आहे.आरक्षण सोडत काढण्यात करिता विशेष ग्रामसभेमध्ये २७ डिसेंबरला सूचना देण्यात येणार आहे. विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्रारूप केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचना, आरक्षण सोडत, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, महिलांसह हे आरक्षण ३१ डिसेंबर रोजी काढले जाणार आहे. त्यानंतर प्रभाग रचनेतील यादीला प्रसिद्धी देऊन १० जानेवारी पर्यंत हरकती मागविल्या जाणार आहेत. आलेल्या हरकती आणि सूचना नोंदवून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे २४ जानेवारीला हे प्रस्ताव जाणार आहेत. त्यानंतर प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवल्यानंतर जिल्हाधिकारी २ फेब्रुवारीला अंतिम प्रसिद्धी देणार आहे. - तालुक्यातील ग्रामपंचायत प्रभागरचना !- एकूण ५८ ग्रामपंचायती- एकूण सदस्य ४९२- एकूण प्रभाग १८८- आरक्षण सोडत ३१ डिसेंबर

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक