शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ला आढावा बैठकीत ६७.७० लाखांचा पाणीटंचाई आराखडा अंतिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:28 IST

वेंगुर्ला तालुका संभाव्य पाणीटंचाई आराखडा ६७.७० लाख रुपयांचा अंतिम करण्यात आला असून तो शासनास पाठविण्यात येणार आहे. तर यावर्षी निधी उपलब्ध असल्याने मंजुरी मिळालेली नियोजित कामे मार्चपूर्वी पूर्ण होतील, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. विंधन विहिरींच्या जागेचे प्रस्ताव कनिष्ठ भूवैज्ञानिक आयत्यावेळी फेटाळतात. मात्र सभेस उपस्थित राहत नसल्याबाबत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देवेंगुर्ला पाणीटंचाई आढावा बैठकीत ६७.७० लाखांचा पाणीटंचाई आराखडा अंतिम भूवैज्ञानिकांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका संभाव्य पाणीटंचाई आराखडा ६७.७० लाख रुपयांचा अंतिम करण्यात आला असून तो शासनास पाठविण्यात येणार आहे. तर यावर्षी निधी उपलब्ध असल्याने मंजुरी मिळालेली नियोजित कामे मार्चपूर्वी पूर्ण होतील, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. विंधन विहिरींच्या जागेचे प्रस्ताव कनिष्ठ भूवैज्ञानिक आयत्यावेळी फेटाळतात. मात्र सभेस उपस्थित राहत नसल्याबाबत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.वेंगुर्ला तालुक्याची संभाव्य पाणीटंचाई आराखडा आढावा सभा येथील साई मंगल कार्यालयात आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, दादा कुबल, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, जिल्हा पाणीपुरवठा अधिकारी श्रीपाद पाताडे, पंंचायत समिती सदस्य यशवंत परब यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.प्रथम पाताडे यांनी गतवर्षीचा पाणीटंचाई आराखडा व झालेली कामे याबाबत माहिती दिली. गतवर्षी मंजूर केलेल्या नळयोजना विशेष दुरुस्तीतील ९ कामांपैकी ४ कामे अद्याप प्रगतीपथावर आहेत. तात्पुरती पूरक नळयोजनांमधील २ कामांपैकी १ काम प्रगतीपथावर तर एका कामास कार्यारंभ आदेश प्राप्त नाहीत.विंधन विहिरीच्या एकूण ५ कामांपैकी १ काम पूर्ण आहे. २ कामे बक्षिसपत्र झाली नाहीत तर २ कामे झालेली नाहीत. विहीर खोल करणे व गाळ काढणे या ९ कामांपैकी फक्त ३ कामे झाली असून ६ कामे झालेली नाहीत. एकूण ३८ कामांपैकी १७ पूर्ण व ५ कामे मार्चपूर्वी करण्याचे नियोजित असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल यांनी गतवर्षी मंजूर झालेल्या कामांना जो निधी मंजूर झाला होता, तो निधी १ वर्षांनंतर काम सुरू केल्यास वाढणार असून त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला. ज्या वर्षीची कामे त्याच वर्षी होण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, असे सुचविले.कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत यांनी विंधन विहिरींच्या जागेचे प्रस्ताव कनिष्ठ भूवैज्ञानिक आयत्यावेळी फेटाळतात. मात्र, या सभेला का उपस्थित राहत नाहीत? असा प्र्रश्न केला. यावर केसरकर यांनी पुढच्यावेळी त्यांना बोलविण्यात येईल, असे सांगितले. आजची ही टंचाईची आढावा बैठक घेत असताना निधीची तरतूद आहे का, ते प्रथम सांगावे. परबवाडा ग्रामपंचायतीतील एक काम मंजूर केले.मात्र, त्याला निधी आला नव्हता. ग्रामपंचायतीने ते ठेकेदारामार्फत करून घेतले. त्यावेळी ठेकेदाराला पैशासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार खेपा माराव्या लागल्या. याकडे परबवाडा सरपंच पपू परब यांनी लक्ष वेधले. यावर पाताडे यांनी यावर्षी भरीव निधी असल्याचे सांगितले. त्यानंतर खानोली, होडावडा, आडेली, वेतोरे, कुशेवाडा, रेडी या भागातीलही सरपंचांनी टंचाईच्या समस्या मांडल्या.दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी वेंगुर्ला तालुक्यातील पाणीटंचाईबाबत ज्या अडचणी असतील त्या जिल्हा परिषदेपर्यंत आणाव्यात. त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे सांगितले. सभेत उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार सभापती अनुश्री कांबळी यांनी मानले.बक्षिसपत्र जमिनींबाबत तोडगा काढणारआमदार केसरकर म्हणाले, तिलारीची नळपाणी योजना वर्षअखेरपर्यंत वेंगुर्ल्यापर्यंत येणार आहे. त्याचा फायदा वेंगुर्ल्याला होईल. तसेच टंचाईतील कामांसाठी सार्वजनिक विहिरीला दोन गुंठे जागा लागते. मात्र,येथील शेतकऱ्यांची जमीन आधीच कमी असते. त्यामध्ये दोन गुंठे बक्षिसपत्राने दिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते. याबाबत येणाऱ्या अडचणी आणि खनिकर्म भागातील जमिनीबाबत आपण ग्रामविकास मंत्री, महसूलमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू, असे सांगितले.

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग