शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वायंगणीला कासव संवर्धन केंद्र हवे

By admin | Updated: January 29, 2015 00:19 IST

ग्रामस्थांची मागणी : कासव प्रजातीच्या संरक्षणासाठी प्राणिमित्र सरसावले-लोकमत विशेष

सावळाराम भराडकर - वेंगुर्लेजीवनाचा आरंभ संघर्षमय होत असल्याने सागरी कासव प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सुमारे शंभर वर्षे आयुर्मान असलेली कासव प्रजात ही मानव व अन्य शत्रूंद्वारे विनाकारण मारली जात असतात. मात्र, वायंंगणी येथील कासवमित्र सुहास तोरसकर व त्यांचे सहकारी याच दुर्मीळ कासवांचे संरक्षण, संवर्धन करत असल्याने दुर्मीळ जातीच्या कासवांच्या प्रजाती वाढण्यास मदत होत आहे.वायंगणी हे दुसरे कासव संवर्धन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते, असे प्राणिमित्र व ग्रामस्थांचेही मत आहे. मात्र, यासाठी शासनाने आर्थिक पाठबळ व कायदेशीर जबाबदारी उचलण्याची आवश्यकता आहे.समुद्र कासव हा सफाई कामगार म्हणून काम पाहतो व सागराचा समतोल राखतो. कासवे माशांची शिकार करीत नाहीत. समुद्रातील मृत किंंवा आजारी मासे किंंवा इतर जलचर खाऊन कासवे समुद्र साफ करतात. ग्रीन टर्टल जातीची कासवे वयाच्या पहिल्या वर्षापासून निव्वळ पाणवनस्पतीवर गुजराण करतात. या वनस्पतीची वाढ रोखली न गेल्यास माणूस व इतर जलचरांना कठीण परिणामांना तोंड द्यावे लागणार आहे. म्हणून कासवांना ‘सागरी गुरे’ म्हणूनही ओळखले जाते. ‘कासवमित्र’ तोरसकर : सुहास तोरसकर गेली २० वर्षे (१९९३ पासून) वैयक्तिक स्तरावर छंद म्हणूनच दुर्मीळ सागरी कासवांचे संरक्षण करीत आहेत. सागरी कासव प्रजात नष्ट होत असल्याने निसर्गावर त्याचा अनिष्ट परिणाम झाल्याचे संशोधनात दिसून आल्याने कासवांचे संरक्षण करण्याचे काम शासनाने हाती घेतले. तोरसकर यांनी मात्र काळाची गरज ओळखून त्याआधीच संवर्धन सुरू केले होते. म्हणूनच त्यांना ‘कासवमित्र’ नावाने संबोधले जाऊ लागले. १ डर्मोचिलीडी (ऊी१े२ूँी’८्रीि) : यामध्ये कातडी कवचांच्या सागरी कासवांचा समावेश होतो. भारतामध्ये त्याची ‘लेदर बँक’ ही एकमेव जात सापडते. २ चिलोनिडी (उँी’ङ्मल्ल्रंिी) : या कुळामध्ये समुद्र किनारी आॅलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक बिल व लाँगर हेड या चार जातींचा समावेश होतो. ग्रीन स्टाईल, आॅलिव्ह रिडले, हॉक बिल, लाँगर हेड, लेदर बॅक प्रजाती असल्या, तरी ग्र्रीन टर्टल, आॅलिव्ह रिडले, हॉक बिल याच प्रजाती समुद्रात अस्तित्वात आहेत. मात्र, लेदर बॅक व लाँगर हेड या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वायंगणी समुद्र किनारी अशा प्रकारांपैकी आॅलिव्ह रिडले जातीची दुर्मीळ कासवेच अंडी घालायला येतात, तर ग्रीन टर्टल व हॉक बिल यांनी एक-दोनदाच दर्शन दिल्याचे निरीक्षणास आले आहे. शासनाने कासवांच्या संरक्षणाची पूर्णत: जबाबदारी व आर्थिक पाठबळ दिल्यास वायंगणी किनारा कासवांचे आणखी एक मॅटर्निटी होम होऊ शकते. मात्र, त्याचवेळी अंड्यांची चोरी व इतर बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यास कडक कारवाई व शिक्षा व्हायला हवी.- सुहास तोरसकर, कासवमित्र.वायंगणी, वेंगुर्ले व तांबळडेग-देवगड किनाऱ्याला पसंती४सागरी कासवे जास्तकरून उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधातील समुद्र पसंत करतात. त्यामुळे वायंगणी, वेंगुर्ले व तांबळडेग-देवगड या समुद्र किनारी गेल्या काही वर्षांत नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात रात्रीच्यावेळी कासवे किनाऱ्यावर येतात व भरती पलीकडील समुद्र किनारी एकांत ठिकाणी (म्हणजेच पाण्यापासून ४० ते ५० मीटरवर) येऊन कासवे मागच्या पायाने वाळूत खड्डा खोदून अंडी घालतात. ४या अंड्यांची संख्या कमीत कमी ७० ते जास्तीत जास्त शंभरच्यावर असते. अंडी घातल्यानंतर त्यांना उष्णता मिळण्यासाठी पुन्हा तशाच प्रकारे खड्डा रेतीने भरून बंद करून समुद्रात जातात. परत अंडी व त्यातील पिल्लांना पुन्हा कधीच पाहत नाहीत. ४तब्बल दोन महिन्यांच्या संरक्षणानंतर साधारणत: ४५ ते ५५ दिवसांच्या कालावधीतून पिल्ले बाहेर येतात. अंड्याबाहेर आल्यावर दोन ते तीन दिवसांनी स्वत:हून वाळूतून मार्ग काढीत घरट्याबाहेर येतात. ४पिल्ले सोडताना थेट समुद्रात न सोडता त्यांना किनाऱ्यावरून काही अंतर चालत जावे लागते. यामुळे पिल्लांच्या मेंदूत किनाऱ्याच्या भू-चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेची नोंद होते व मोठी झाल्यावर कासवे याच किनाऱ्यावर विणीसाठी परतात.४शरीराची रचना व जात यावरच कासवांच्या अंड्यांची संख्या अवलंबून असते. आॅलिव्ह रिडले हे कासव दरवर्षी अगर दोन ते तीन वर्षांच्या अंतराने अंडी घालते, तर ग्रीन टर्टल व इतर कासवे तीन ते चार वर्षांच्या अंतराने अंडी घालतात. कधी-कधी हा कालावधी ११ वर्षांपर्यंतचा असतो. ४सागरी कासवे गोल अगर लंबवर्तुळाकार अंडी घालतात. त्यांचा रंग पांढरा असतो, तर लेदर बुक कासवांच्या अंड्ड्यांचा रंग पांढरा किंवा पिवळट असतो. त्यावर हिरव्या रंगाचे ठिपके असतात. ४कासवांच्या जीवनक्रमाचे गूढ आहे. त्यांची पिल्ली समुद्रात गेली की प्रौढ झाल्यावर मादी कासवे अंडी लावण्यासाठी किनाऱ्यावर येतात. तेही फक्त एक ते दोन तासांसाठी. तर कासवे किनाऱ्यावर येतच नाहीत.४कासवे अंडी घातल्यानंतर त्यांची पूर्ण जबाबदारी निसर्गावर सोपवून निघून जातात. त्यांची अंडी व नवजात पिल्ले कोल्हे, तरस, मुंगूस, खेकडे, साप, शार्क, घार, गरूड, पक्षी यांच्यासाठी मोठी मेजवानी असते. ४कासवाच्या डोळ्याजवळ मोठ्या गं्रथी असतात व त्याद्वारे शरीरात अन्न व पाण्याबरोबर आलेले अतिरिक्त क्षार (मीठ) बाहेर टाकण्याचे काम सुरू असते. याबाबत दंतकथा आहेत. जननदर ७५ टक्क्यांवरगेली २० वर्षे सुहास वनविभाग, मित्र, ग्रामस्थ, वेंगुर्ले तालुक्यातील मित्रमंडळी व अधिकारी वर्ग यांच्या मदतीने जिल्ह्याचा संपूर्ण किनारा पिंजून काढतात व ज्या ठिकाणी अंडी असतील, तेथे चारही बाजूने जाळे लावून कुंपण करतात. जेणेकरून कुत्रे व अन्य प्राण्यांपासून त्यांचे भक्षण होऊ नये. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कासवांचा नैसर्गिक जननदर जो जेमतेम ४० ते ५० टक्के होता, तो आता ७५ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. ग्रामस्थांचे सहकार्य व वनस्पती शास्त्र केळकर विद्यालय देवगडचे प्राणिमित्र डॉ. नागेश दफ्तरदार यांचा मोलाचा सल्ला मिळाल्याचे सुहास आवर्जून सांगतात.