शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

करुळमध्ये मतदान यंत्रात बिघाड; मतदानाचा तासभर खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 17:15 IST

अत्यंत प्रतिष्ठेच्या करुळ ग्रामपंचायतीच्या माध्यमिक विद्यालयातील प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान यंत्रात सकाळी १०.३० च्या सुमारास बिघाड झाल्याने एकच तारांबळ उडाली.

ठळक मुद्देप्रशासनासह उमेदवारांची उडाली तारांबळमनी, मदिरेच्या मांडवलीची जोरदार चर्चालोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने प्रकरण मिटविले

वैभववाडी : अत्यंत प्रतिष्ठेच्या करुळ ग्रामपंचायतीच्या माध्यमिक विद्यालयातील प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान यंत्रात सकाळी १०.३० च्या सुमारास बिघाड झाल्याने एकच तारांबळ उडाली.

तहसीलदार संतोष जाधव यांनी तत्काळ मतदान केंद्राला भेट देत  मतदानयंत्राच्या बिघाडामुळे थांबलेली मतदान प्रक्रिया तासाभराने सुरळीत केली. तर काही गावात रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाच्या हाती मनी आणि मदिरा लागले. मात्र, लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने प्रकरणे परस्पर निपटून टाकल्याची सकाळपासून तालुक्यात जोरदार चर्चा होती. तसेच रात्री बाहेरील लोक दुसऱ्या गावात फिरताना आढळल्याने किरकोळ बाचाबाची झाली. मात्र, त्याचा मतदान काळात परिणाम झालेला नाही.

करुळमध्ये समर्थ विकास पॅनेलचे आणि ग्रामविकास पॅनेलमध्ये अत्यंत अटीतटीची निवडणूक होत आहे. करुळ माध्यमिक विद्यालयात प्रभाग क्रमांक दोनचे मतदान केंद्र होते. सकाळी १०.३० च्या सुमारास १५२ इतके मतदान झाले असता मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला. त्यामुळे मतदारांसह उमेदवारांची तारांबळ उडाली. करुळचे निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत भरसट यांनी मतदान यंत्राच्या बिघाडाची कल्पना तहसीलदार जाधव यांना दिली. त्यामुळे तहसीलदार जाधव व अव्वल कारकून संभाजी खाडे दुसऱ्या यंत्रासह मतदान केंद्रावर दाखल झाले.

मतदान यंत्राच्या बिघाडामुळे केद्राबाहेर सुमारे शंभर मतदार तासभर ताटकळत बसले होते. तर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मतदान केंद्रासमोरून सतत येरझऱ्या घालीत होते. ११.३० च्या सुमारास पुन्हा तेथील मतदान प्रक्रिया सुरळीत होताच मतदार, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी सुटकेचा श्वास टाकला. करुळमध्ये दुपारी १ पर्यंत सरासरी चुरशीने ५० टक्के मतदान पार पडले होते.

लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने प्रकरण मिटविलेनिवडणूक होणाऱ्या काही गावांमध्ये रात्री पोलिसांची गस्त सुरू होती. खोरीतील एका गावात दोन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांजवळ पोलिसांना मनी आणि मदिरा सापडली. त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यापूर्वीच काही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने प्रकरण परस्पर मॅनेज केले गेल्याची तालुक्यात सकाळपासूनच चर्चा रंगली होती. तर काही गावात बाहेरून गेलेल्या युवकांना स्थानिकांनी हुसकावून लावण्याची चर्चा होती. मात्र, या प्रकारांचा मतदान कालावधीत कोणताही परिणाम झालेला नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkonkanकोकण