शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली नगरपंचायतीसाठी ६ एप्रिलला मतदान, रणसंग्रामास प्रारंभ, दिग्गजांमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 21:57 IST

कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहिता जाहीर केली आहे. या नगरपंचायतीची १६ एप्रिल रोजी मुदत संपत आहे.

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहिता जाहीर केली आहे. या नगरपंचायतीची १६ एप्रिल रोजी मुदत संपत आहे. ६ एप्रिल रोजी निवडणूक मतदान होणार असून, यावेळी नगरपंचायतीचा नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक थेट जनतेतून निवडून देण्यात येणार आहेत. आचारसंहिता सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून जाहीर झाली असून ७ एप्रिल पर्यंत असणार आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे या निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू होणार आहे.कणकवली नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर २००३ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यात आला होता. मात्र त्यानंतर सन २००८ व २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत बहुमताच्या आधारावर नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड झाली होती. आता २०१८ मध्ये होणा-या या निवडणुकीत पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नव्याने स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रथमच निवडणूक लढवित असून त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे. तर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे तसेच गाव विकास आघाडीही स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे आता कणकवलीत शहरातील वातावरण तापणार आहे. असा असेल निवडणूक कार्यक्रमकणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी आचारसंहिता जाहीर झाली. या निवडणुकीचा कार्यक्रम ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी जारी करणार आहेत. १२ मार्चपासून नामनिर्देशन पत्र आॅनलाईन पद्धतीने सादर करता येणार असून १९ मार्चपर्यंत सुट्टीचा दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंच्या कालावधीत ते स्विकारण्यात येणार आहेत. २० मार्च रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत आहे. २७ मार्च रोजी अंतिमरित्या निवडणुक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबरोबरच निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे.  ६ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी करुन निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात लक्षवेधीसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली शहरातील नगरपंचायत निवडणुकीला फार महत्व आहे. ही नगरपंचायत आपल्या ताब्यात असावी यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे. माजी मुख्यमंत्री तथा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे आणि  भाजपा नेते संदेश पारकर यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या ठरणा-या या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनीही पूर्ण ताकदिनीशी उडी घेतल्याने यावेळची निवडणूक अतिशय रंजक आणि लक्षवेधी असणार आहे.