शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावायला हवा, प्रांताधिकारी कातकर यांचे आवाहन 

By सुधीर राणे | Updated: April 15, 2024 13:31 IST

कणकवली: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिली आहे. तसेच राज्यघटनेने लोकशाही व्यवस्था निर्माण केली आहे. जगातील सर्वात मोठी ...

कणकवली: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिली आहे. तसेच राज्यघटनेने लोकशाही व्यवस्था निर्माण केली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ होणार आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीला खूप महत्त्व असून मतदाराला राजा असे संबोधले जाते.कणकवली विधानसभा मतदारसंघातील शंभर टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार   बजावायला हवा, असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले.भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदार जागरूकता व निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत कणकवली उपविभागीय कार्यालय , कणकवली तहसीलदार कार्यालय यांच्यावतीने कणकवली शहरातून लोकसभा निवडणुकीबाबत जनजागृती करण्यासाठी सायकल व मोटर बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी जगदिश कातकर बोलत होते.    यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे म्हणाले, स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मेळावा, महिला मिळावा, वृद्ध मेळावा असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशाने स्विप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली आहे. याद्वारे एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये, प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे असेही देशपांडे म्हणाले.रॅलीची सुरुवात तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. रॅली सर्व्हीस रस्त्यावरून पटवर्धन चौकातून बाजारपेठ, पटकी देवी, नगरपंचायत, कॉलेज रोड मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. रॅलीच्या सुरुवातीला 'मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो', 'वृद्ध असो की जवान, प्रत्येकाने करा आपले मतदान', 'मतदान हा माझा हक्क आहे, मी मतदान करणारच' अशा घोषणा देत मतदानाची शपथ घेण्यात आली.रॅलीत प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नायब तहसीलदार प्रिया हर्णे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मंडल अधिकारी दिलीप पाटील, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अघम यांच्यासह कनक रायडर्सचे सायकलिस्ट, विद्यामंदिर कणकवली व एस.एम.हायस्कूल कणकवलीचे विद्यार्थी, कणकवली कॉलेजचे एनएसएसचे विद्यार्थी त्याचबरोबर एनसीसीचे विद्यार्थी, शिक्षक तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग