शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

उलटी होऊन ताप अन् अशक्तपणा आला, कुडाळमधील शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 11, 2023 16:53 IST

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : देवगड तालुक्यातील जामसंडे श्रीकृष्णनगर येथील रहिवासी व सध्या कुडाळ माठेवाडा येथे राहणाऱ्या ध्रुव मुकेश ...

कुडाळ (सिंधुदुर्ग) : देवगड तालुक्यातील जामसंडे श्रीकृष्णनगर येथील रहिवासी व सध्या कुडाळ माठेवाडा येथे राहणाऱ्या ध्रुव मुकेश आंबेरकर (वय-११) या विद्यार्थ्याचे बुधवारी (दि.९) उपचारादरम्यान निधन झाले. त्याला उलटी झाल्याने तसेच ताप येऊन अशक्तपणा आल्याने मंगळवारी (दि.८) कुडाळ येथील डॉ. रावराणे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने त्याला  पडवे येथील एसएसपीएम रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.ध्रुव येथील कुडाळ हायस्कूलमध्ये सहावीत शिकत होता. त्याच्या आकस्मिक निधनाने आंबेरकर कुटुंबाला धक्का बसला असून, जामसंडेनगर गावावर शोककळा पसरली आहे. पडवे येथे निधन झाल्याचे घोषित केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

याबाबत देवगड पोलिस ठाण्यात कळविण्यात आले. मात्र, मृत्यूमागील निश्चित कारण समजू शकलेले नाही. ध्रुवला उलटी झाल्याने अशक्तपणा आल्याने कुडाळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. धुव्र याच्यावर जामसंडेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeathमृत्यू