शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गावठी हातभट्टी दारूवर छापा, फाथरनवाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 10:45 IST

कुडाळ तालुक्यातील फाथरनवाडी येथे बिगर परवाना कायदा गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्या प्रकरणी सुरेश परब (७०, राहणार सरंबळ परबवाडी) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

ठळक मुद्दे गावठी हातभट्टी दारूवर छापा, फाथरनवाडी येथील घटनासरंबळ येथील वृद्धावर गुन्हा दाखल, मुद्देमालासह आरोपी ताब्यात

कुडाळ : तालुक्यातील फाथरनवाडी येथे बिगर परवाना कायदा गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्या प्रकरणी सुरेश परब (७०, राहणार सरंबळ-परबवाडी) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस योगेश मांजरेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की फाथरनवाडी येथे गैरकायदा बिगर परवाना हातभट्टीची दारू काढण्यात येत असल्याची माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली.

या माहितीनुसार कुडाळ पोलीस मंगळवारी सायंकाळी सदर ठिकाणी पंच व एका स्थानिकाला सोबत घेऊन गेले. यावेळी एका झोपडीवजा शेडमध्ये हातभट्टीची दारू काढण्यात येत असल्याचे येथील सर्व साहित्यावरून दिसून आले. त्यामुळे याप्रकरणी संशयित म्हणून सुरेश परब यांना ताब्यात घेत पोलिसांनी पंचनामा केला असता त्याने हातभट्टीची जागा दाखवली.परब यांनी यावेळी सदरचे हे रसायन आम्ही शेती फवारणीसाठी तयार करत असल्याचेही सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कृषी विभागाचे अधिकारी यांनाही बोलून सदरची खात्री केली असता कृषी अधिकारी यांनी सदरचे हे रसायन औषध फवारणीसाठी नसल्याचे सांगितले. त्यामुळे या ठिकाणी हातभट्टीची दारू करण्यात येत असल्याचे सिद्ध झाले.कुडाळ पोलिसांनी या प्रकरणी सुरेश परब यांच्यावर गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरून पोलिसांनी हातभट्टीची दारू काढण्यासाठी वापरण्यात येत असलेले रसायन भरलेले सुमारे ४ हजार ८०० रुपये किमंतीचे २ अ‍ॅल्युमिनियम धातूचे ड्रम, सुमारे ३ हजार ६०० रुपये किंमतीची अ‍ॅल्युमिनियमची टाकी त्यामधील वीस लिटर रसायन, ३ हजार रुपयाचे प्लास्टिकचे रसायन भरलेले कॅन, १ हजार ५०० रुपयाचे लोखंडी उपकरण यामध्ये स्टीलच्या धातू फिरवण्याचा हँडल तसेच इतर रसायने व मोरचूद असे साहित्य जप्त केले.घटनास्थळी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी ही पाहणी केली असून या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग