शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

विक्रमी दर : पावसाने मारले, पीक परिस्थितीपुढे हरले तरीही...

By admin | Updated: March 15, 2015 00:22 IST

उत्पादन घटल्याने रत्नागिरीच्या काजूला सोन्याचा भाव

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी अवकाळी पावसाचा फटका बसला असला, तरी एकूणच हवामानातील बदलांमुळे काजू पिकाची उत्पादकता घटल्याचे दिसून येत आहे. उत्पादन कमी असल्यामुळे काजू बीच्या दरामध्ये मात्र तेजी दिसून येत आहे. सध्या ९० ते १०५ रूपये दराने काजू बी खरेदी करण्यात येत आहे. मात्र, हा दर काजूच्या दर्जानुसारच ठरत आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. गतवर्षी १ लाख ४ हजार ८४७ मेट्रीक टन काजू उत्पादन प्राप्त झाले होेते. यावर्षी पावसाळा लांबल्याने थंडीही लांबली त्यामुळे मोहोर प्रक्रियाच उशिरा सुरू झाली. त्यामुळे गतवर्षी ८५ ते ७५ रूपये किलो दराने काजू खरेदी करण्यात येत होता. मात्र, यावर्षी १०५ रूपयांपासून काजू बीला दर उपलब्ध झाला. काजूच्या दर्जावर दर ठरत आहे. हायब्रीड काजू १०० ते १०५ रूपये दराने खरेदी करण्यात येत आहे. काजू पिकावर पावसाचा परिणाम जाणवणार नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. मात्र, काजू बी पिकल्यानंतर पाऊस आल्यास त्याचा परिणाम जाणवू शकतो. हवामानामुळे काजू बीच्या उत्पादनाबरोबर दर्जावरही परिणाम झालेला दिसून येत आहे. बी आकाराने लहान दिसून येत आहे. त्यामुळे प्रति किलोला १६५ ते १७० नग इतकी मोठ्या आकाराची बी प्राप्त होते. तर छोट्या आकाराची १८० ते २०० नग बी प्राप्त होते. अवकाळी पावसामुळे सध्या काजू बीमध्ये १३ ते १६ टक्के मॉश्यूरायझर आढळत आहे. त्यामुळे ही बी वजनाला जास्त भरत आहे. एकूण हवामानामुळे ४० टक्के पिकाचे नुकसान झाले असले तरी ६० टक्के पिक हातात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पावसामुळे मोहोरावर बुरशीचा प्रादूर्भाव झाला होता. परंतु, वातावरणात उष्मा भरपूर असल्याने बुरशीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी शेवटच्या टप्प्यातीलही काजू हातात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काजू विक्रेते निवडक दर्जेदार काजू बी खरेदी करतात. त्यामुळे शहरात आणून बी निवडूनच काट्याला लावली जाते. यावर्षी उत्पादनावर परिणाम झाल्याने दर टिकून राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.