शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विजयदुर्ग किल्ला-बंदर येथे २९ ते ३० डिसेंबर कालावधीत विजयदुर्ग महोत्सव, विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 16:17 IST

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्यावतीने २९ ते ३० डिसेंबर या कालावधीत विजयदुर्ग किल्ला-बंदर येथे विजयदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाळूशिल्प व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवासाठी गाव आपलो, सन्मान सर्वांचो या ब्रीदवाक्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविजयदुर्ग महोत्सवासाठी गाव आपलो, सन्मान सर्वांचो या ब्रीदवाक्याची घोषणा वाळूशिल्प व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन आॅर्केस्ट्रा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचे स्वागत करण्यात येणार

देवगड : विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्यावतीने २९ ते ३० डिसेंबर या कालावधीत विजयदुर्ग किल्ला-बंदर येथे विजयदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाळूशिल्प व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवासाठी गाव आपलो, सन्मान सर्वांचो या ब्रीदवाक्याची घोषणा करण्यात आली आहे.२९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता विजयदुर्ग एसटी आगार ते विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत लेझिम पथकासह मिरवणूक, १० वाजता विजयदुर्ग किल्ला येथे सर्वधर्मीय प्रार्थना, १०.३० वाजता विजयदुर्ग किल्ला ते पोर्ट ट्रस्ट आॅफिस स्टेजपर्यंत मिरवणूक, ११ वाजता विजयदुर्ग महोत्सवाचे  उद्घाटन, दुपारी ३ वाजता इतिहासतज्ज्ञ अमर आडके यांच्यासोबत विजयदुर्ग किल्ले दर्शन, सायंकाळी ५ वाजता सेंद्रिय शेतीसंदर्भात मार्गदर्शन, ६ वाजता जुन्या-नव्या गाण्यांचा  सूरसंगम कार्यक्रम, रात्री ८ वाजता विद्यार्थ्यांचे डान्स, रात्री १० वाजता मालवणी काव्यवाचन व मालवणी कॉमेडी.

३० रोजी सकाळी ९ वाजता विजयदुर्ग चौपाटी येथे पहिली ते दहावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय किल्लेबांधणी स्पर्धा, ९ वाजता जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन, ५ वाजता महिलांसाठी खास  होम मिनिस्टर कार्यक्रम, ६ वाजता स्थानिक महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८ वाजता सूरसंगम कार्यक्रम, १० वाजता कलंदर ग्रुप आयोजित धमाल विनोदी कार्यक्रम आयोजित केला असून तो रविकांत राणे सादर करणार आहेत.३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्लो सायकलिंंग स्पर्धा, १० वाजता तालुकास्तरीय नौकानयन स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता कोल्हापुरी मर्दानी खेळ, ७ वाजता ऐतिहासिक शाहीर पोवाडा गायन, रात्री ९ वाजता विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.

महोत्सवातील विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार व त्यानंतर आॅर्केस्ट्रा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नितीन जावकर व विजयदुर्ग अध्यक्ष डॉ. यश वेलणकर यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगड