शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सभेत राणे-राऊतांमध्ये शाब्दिक चकमक; राणे-केसरकरांचे सूर जुळले

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 4, 2022 18:46 IST

खासदार विनायक राऊत यांनी सभेचे अध्यक्ष कोण आहे आणि नेमकं मिटिंग कोण चालवतंय, असा सवाल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केला.

सिंधुदुर्ग : दिवाळी संपत आली तरी फटाके फुटण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. दिवाळीपाठोपाठ जिल्ह्यात राजकीय फटाके फुटत असल्याचे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिसून आले. या बैठकीत काही मुद्द्यांवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे बैठकीत काही काळ गोंधळ निर्माण झाला.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शुक्रवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नवी सरकार झाल्यानंतर पहिलीच सभा झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते.नियोजन समितीची सभा सुरू झाल्यानंतर १ एप्रिल २०२२ पासूनच्या कामांना शिंदे सरकारने स्थगिती दिली असल्याचे सांगत या कामांची खासदार राऊत यांनी सभेत माहिती मागितली. मात्र, या विषयाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेप घेत सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालावे. कोणाच्या काही सूचना असतील तर त्या आयत्यावेळी येणाऱ्या विषयांमध्ये घेण्यात याव्यात, अशी सूचना सभाध्यक्षांना केली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सभेचे अध्यक्ष कोण आहे आणि नेमकं मिटिंग कोण चालवतंय, असा सवाल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केला. त्यानंतरही खासदार राणे बोलत राहिले. यावरून केंद्रीय मंत्री राणे आणि खासदार राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे या बैठकीत काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वादावर पडदा टाकला.राणे - केसरकर यांचे सूर जुळलेखासदार विनायक राऊत हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या आक्षेपावर भाष्य करीत असताना केंद्रीय मंत्री राणे आणि मंत्री केसरकर यांच्यात दबक्या आवाजात काही चर्चा झाली. यात दोघेही एकमेकांशी बोलताना गालातल्या गालात हसत होते. त्यामुळे राणे यांनी केसरकर यांचे सूर जुळले की काय असे वाटत होते. त्यानंतर राणे यांनी मंत्री चव्हाण आणि केसरकर यांनी जिल्हा नियोजनच्या निधीमध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Vinayak Rautविनायक राऊत