शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्लेत मिळतेय फणसाचे आईस्क्रीम- : ग्राहकांकडून मनमुराद आस्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 20:47 IST

उन्हाळा म्हटला की, प्रकर्षाने आठवण होते ती शीतपेयांची किंवा आईस्क्रीमची. प्रचंड उकाड्यातून शरीराला थंडावा मिळण्यासाठी शीतपेये किंवा आईस्क्रीमची खरेदी केली जाते. अलीकडे वेगवेगळ््या कंपन्यांनी विविध प्रकारचे आईस्क्रीम बाजारात आणले आहेत.

ठळक मुद्देलोणे दाम्पत्याची आगळीवेगळी संकल्पना

प्रथमेश गुरव ।वेंगुर्ले : उन्हाळा म्हटला की, प्रकर्षाने आठवण होते ती शीतपेयांची किंवा आईस्क्रीमची. प्रचंड उकाड्यातून शरीराला थंडावा मिळण्यासाठी शीतपेये किंवा आईस्क्रीमची खरेदी केली जाते. अलीकडे वेगवेगळ््या कंपन्यांनी विविध प्रकारचे आईस्क्रीम बाजारात आणले आहेत. असे असले तरी वेंगुर्ले येथील राजाराम लोणे व राधिका लोणे यांनी फणसापासून बनविलेल्या आईस्क्रीमला चांगली पसंती मिळत असून, या आईस्क्रीमचा ग्राहक मनमुराद आस्वाद घेत आहेत.

एप्रिल-मे महिन्यांत बरीच फळे बाजारात विकायला येतात. यातील बरीच फळे पौष्टिक गुणधर्म असलेली असतात. दिवसेंदिवस या फळांवर विविध प्रकारे प्रक्रिया करून ती बाजारात विक्रीसाठी आणली जात आहेत. बाहेरून काटेरी आवरण व आत रसाळ असलेला फणस कोकणात कोठेही दृष्टीस पडतो. संतांनीसुद्धा ‘फणसाअंगी काटे। आत अमृताचे साठे’ अशा प्रकारे एका अभंगात फणसाची महती सांगितली आहे. फणसापासून लोणचे, जॅम, जेली, फणस पोळी, चिवडा, चिप्स, पेय, आदी पदार्थ बनविले जातात. या उत्पादनांना बाजारपेठेतही चांगली मागणी आहे. तसेच फणसामध्ये अनेक पौष्टिक तत्त्वे आहेत. यामध्ये ‘अ’, ‘क’ ही जीवनसत्त्वे, थियामीन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लाविन, नियासिन आणि झिंकसारख्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे.

अशा या बहुपयोगी फणसाच्या पारंपरिक उत्पादनांना फाटा देत त्याचा आस्वाद वेगळ्या पद्धतीने कसा घेता येईल, या विचारात असतानाच वेंगुर्ले-दाभोसवाडा येथील राजाराम लोणे व राधिका लोणे या दाम्पत्याला फणसाच्या आईस्क्रीमची कल्पना सूचली. या कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन त्यांनी फणसाच्या आईस्क्रीमची निर्मिती केली आहे.मोती तलाव उत्सवातही प्रतिसादकोणतीही कृत्रिम रसायने न वापरता एका लाकडाच्या ड्रममध्ये हाताने हे आईस्क्रीम बनविले जाते. लोणे दाम्पत्याने आपल्या कल्पकतेतून बनविलेल्या या फणसाच्या आईस्क्रीमची ग्राहकांना चांगलीच भुरळ पडल्याचे दिसून येत आहे. सावंतवाडी येथे झालेल्या मोती तलाव महोत्सवात लोणे दाम्पत्याने फणसाच्या आईस्क्रीमचा स्टॉल लावला होता. ग्राहकांनी या स्टॉलला भेट देत फणस आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. 

निसर्गाने आपल्याला औषधी गुणधर्म असलेली फळे दिली आहेत. अशा फळांचा बारकाईने अभ्यास केल्यास फणस आईस्क्रीमसारखी नावीन्यपूर्ण उत्पादने आपण घेऊ शकतो आणि त्यामुळे हंगामी रोजगारही मिळेल.- राजाराम लोणे, वेंगुर्ले 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण