शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेचा वेंगुर्ला पॅटर्न गोव्यात राबविणार, आमदार उल्हास तुयेकर यांचे मत

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 6, 2023 15:08 IST

गोव्यातील आमदारांची कचरा प्रकल्पाला भेट

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) : कचरा ही एखाद्या शहराला भेडसावणारी समस्या असते. वेंगुर्ला शहराचा कचरा डेपोला भेट दिल्यावर कचराही समस्या नसून उत्पन्न मिळविण्याचे स्त्रोत असल्याचे निदर्शनास येते. अशा कचरा डेपोमध्ये येणारे मान्यवर जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. वेंगुर्ल्याप्रमाणेच गोव्यामध्ये असा प्रकल्प उभारण्यासाठी मार्गदर्शन घेऊन प्रयत्न करणार असल्याचे मत गोवा विधानसभा आमदार तथा कदंबा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी मांडले.

राष्ट्रीय स्तरावर अव्वल मानांकन मिळविलेल्या वेंगुर्ला नगर परिषदेचे प्रकल्प पाहण्यासाठी गोवा विधानसभा आमदार तथा कदंबा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, दिवली नावेली गावचे सरपंच संतोष नाईक, उपसरपंच सायमन कार्वालो, ग्रामपंचायत सदस्य साईश राजाध्यक्ष, विद्याधर आर्लेकर, मिशल मीरांडा, संपदा नाईक, व्ही. डी. सी. चे चेअरमन जयानंद देसाई, मेंबर दिनेश माने, रवी अमरापुरकर, नारायण कांबळी आदींनी ५ डिसेंबर रोजी वेंगुर्ला येथे भेट दिली. वेंगुर्लावासीय व नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेप्रती देण्यात येणाऱ्या अमूल्य योगदानामुळे वेंगुर्ला शहराला नावलौकिक प्राप्त झाला असल्याचे मुख्याधिकारी कंकाळ यांनी उपस्थितांना सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, नगर परिषदेचे स्वच्छता ब्रॅण्ड ॲम्बेसिडर सुनील नांदोस्कर व नगर परिषदेचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.नगर परिषदेचे कौतुकमुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सर्वांचे स्वागत करून नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात स्वच्छता संकल्पनेवर आधारित चित्रफिती, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नावीन्यपूर्ण विकास कामे यांची माहिती दिली. त्यानंतर उपस्थितांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन प्रकल्प यांची पाहणी केली. वेस्ट टू बेस्ट या संकल्पनेनुसार विकसित केलेल्या मिरॅकल पार्क व यमादोरी गार्डन तसेच कलादालन यांना भेट दिली. झिरो वेस्ट संकल्पनेनुसार पर्यावरण पूरक पत्रावळ्या, द्रोण व ग्लास यातून मान्यवरांना कंपोस्ट डेपो येथे स्नेह भोजन देण्यात आले. विविध प्रकल्प पाहून गोवा येथील या मान्यवरांनी वेंगुर्ला नगर परिषदेचे कौतुक केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न