सिंधुदुर्गनगरी : केरळमध्ये हत्तींच्या हत्येप्रकरणी संशयित असलेला वासू माधवन आयकरमक्कम याने आत्महत्या केल्याची घटना दोडामार्ग येथील भिकेकोनाळ येथे घडली आहे. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी दोडामार्ग राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.शुक्रवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी व निवासी जिल्हा पोलीस उपअधीक्षक अनंत आरोसकर यांची दोडामार्ग काँग्रेस तालुकाध्यक्षांसह शिष्टमंडळाने भेट घेत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, रमाकांत देसाई, भरत जाधव, अनंत शेटकर, संदीप गावकर, प्रसाद कुडासकर, संतोष देसाई आदी काँग्रेसचे शिष्टमंडळ उपस्थित होते.भिकेकोनाळ येथे अननस बागेत गळफास लावून तेथे राहणाऱ्या व हत्तींच्या हत्येप्रकरणी संशयित असलेला वासू माधवन आयकरमक्कम याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास सुरु आहे. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी ‘त्या’ केरळीयनाचा मृतदेह एका खासगी गाडीतून नेण्यात आला. शवविच्छेदन प्रक्रियाही घाईगडबडीने करण्यात आली. तो रहात असलेल्या ठिकाणी मोबाईल सापडला. मात्र त्या मोबाईलमध्ये सीमकार्ड नव्हते. त्यामुळे संशय बळावला असून या प्रकरणी तपासासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी अशी मागणी तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी केली आहे.दोडामार्ग तालुक्यात केरळीयनांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे वास्तव्य लक्षात घेता अननस, केळी बागायतीत काम करणारे केरळीयन हे खरोखरच कामगार म्हणून येत आहेत की त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी काही गुन्हे करून लपण्यासाठी त्यांनी दोडामार्ग तालुका क्षेत्र निवडले आहे? याबाबतची चौकशी व्हावी. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासनहत्तीच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी वासू माधवन आयकरमक्कम याने गळफास लावून आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र ही आत्महत्या की घातपात? असा संशय तालुका काँग्रेसच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेत या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल असे आश्वासन दिल्याची माहिती काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिली.योग्य तपास न झाल्यास आंदोलन करणारहत्तीच्या हत्येप्रकरणी संशयित असलेल्या वासु माधवन आयकरमक्कमने आत्महत्या केली की त्याचा घातपात करण्यात आला या दृष्टीने पोलीस यंत्रणेने योग्य तो तपास करावा व नेमके सत्य जनतेसमोर आणावे. अन्यथा दोडामार्ग तालुका काँग्रेसच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी दिला आहे.
वासू आयकरमक्कमचा घातपातच
By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST