शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएमचे कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन सातव्या दिवशीही सुरू होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 15:59 IST

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएमचे कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन सातव्या दिवशीही सुरू होते.

ओरोस : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएमचे कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन सातव्या दिवशीही सुरू होते.

या आंदोलनाची तीव्रता वाढत असून एनआरएचएम अंतर्गत प्राथमिक आरोग्यकेंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. २१ एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास या कामबंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.एनआरएचएम कर्मचाऱ्यांना विनाअट शासनसेवेत सामावून घ्यावे, सेवेतील अनुभवी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना शासनाच्या सरळसेवा भरतीत प्राधान्य द्यावे, त्यासाठी असलेली वयाची अट शिथिल करावी, कामावर आधारित सुधारित गुण पद्धत बंद करावी. समान काम-समान वेतन कायदा लागू करावा, आरोग्य विभागाचे खासगीकरण करू नये, सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची गरोदर व प्रसुती रजा द्यावी, अशा मागण्या या संघटनेच्या आहेत.

या मागण्यांच्या पूर्ततेसाठी या कर्मचाºयांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन बुधवारी सातव्या दिवशी सुरू होते. या आंदोलनाला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. २१ रोजी मंत्रालयात होणाऱ्या बैठकीला आपण स्वत: व आमदार नाईक उपस्थित राहून आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची ग्वाही दिली.या आंदोलनात आम्ही वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष सहभागी नसलो तरी आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. २१ रोजी होणाऱ्या बैठकीत योग्य तो निर्णय न झाल्यास आम्ही या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेऊ. तूर्तास आम्ही अतितत्काळ रुग्ण सेवा देत असून बाह्य रुग्ण सेवा पूर्णत: बंद केली असल्याचे डॉ. कृपा गावडे यांनी स्पष्ट केले.रुग्णसेवेवर कोणताही परिणाम नाही : डॉ. साळेकामबंद आंदोलनात एनआरएचएम कर्मचारी सहभागी असले तरी नियमित कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या आंदोलनाचा रुग्ण सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्यास रुग्ण सेवेवर नक्कीच परिणाम होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटल