शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

त्या ठेक्यांचे वराडकरांनी आत्मपरीक्षण करावे : मंदार केणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 16:38 IST

malvan, muncipaltyCarporation, sindudurg मालवण नगरपरिषदेमध्ये सध्या पाणीपुरवठा, कचरा, वाहन ठेके हे कुणाच्या आशीर्वादाने चालले आहेत त्याचे आत्मपरीक्षण उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी करावे. स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करण्याचा धंदा आता बंद करावा

ठळक मुद्देत्या ठेक्यांचे वराडकरांनी आत्मपरीक्षण करावे : मंदार केणी उपनगराध्यक्षांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य नसतेच

मालवण : मालवण नगरपरिषदेमध्ये सध्या पाणीपुरवठा, कचरा, वाहन ठेके हे कुणाच्या आशीर्वादाने चालले आहेत त्याचे आत्मपरीक्षण उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी करावे. स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करण्याचा धंदा आता बंद करावा. नगराध्यक्ष यांना जनतेने निवडून दिले आहे. ते आपल्या कामकाजाचा लेखाजोखा निवडणुकीत जनतेसमोर मांडतीलच. वराडकर हे वैफल्यग्रस्त झाले असून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला मदत न करता राजकीय वक्तव्य करण्यात ते धन्यता मानत आहेत, अशी टीका नगरसेवक मंदार केणी यांनी केली.उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्ष महेश कांदळकर यांच्यावर केलेल्या टीकेचा नगरसेवक केणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे समाचार घेतला आहे. नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी उपनगराध्यक्ष वराडकर यांचे पालिकेतील अर्थकारण पूर्णपणे निष्क्रिय करून टाकले आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले वराडकर हे त्याच पक्षाच्या महिला आरोग्य सभापती यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षांवर टीका करणारे उपनगराध्यक्ष नक्की कोणत्या पक्षाचे आहेत ? असा सवाल केणी यांनी केला आहे.या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, अग्निशमन नवीन वाहन खरेदीबाबत नवीन गाडीसाठी १ कोटी मागणीचा प्रस्ताव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शिफारस घेऊन अग्निशमन विभागास सादर करण्यात आला आहे. सध्या कोरोना संकट काळात सर्वच प्रशासकीय कामकाज निधी वितरण याबाबत निर्णय घेण्यास विलंब झालेला असल्याने याकामी उशीर होत आहे. उपनगराध्यक्ष जनतेमध्ये गैरसमज पसरवित आहेत.मालवणच्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सावंतवाडी येथील खासगी सक्शन गाडी भाडे तत्त्वावर आणून गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत पालिकेत अर्थकारण हिशेब मांडणाऱ्या उपनगराध्यक्ष यांच्या विचारांच्या पलीकडे आम्ही काम करतो आहोत.भाजपमध्ये राहून भाजपवरच बाणभाजपमध्ये राहून कुठल्या पक्षाच्या दिशेने बाण मारत आहेत, हे उपनगराध्यक्ष वराडकर यांनी आधी स्पष्ट करावे. सतत प्रसिद्धीत राहण्यासाठी सोयीनुसार भाजपच्या पदाचा आधार घेऊन आपल्याच पक्षाच्या सभापतींवर आरोप-प्रत्यारोप करायचे ही उपनगराध्यक्ष यांची कामगिरी आहे.ज्या पक्षातून निवडून येतात, त्याच पक्षाशी गद्दारी करतात, हा वराडकर यांचा राजकीय इतिहास आहे. यावेळी पालिका निवडणुकीत घोडेबाजार चालणार नाही याचे भान त्यांनी ठेवावे, असा चिमटा मंदार केणी काढला. तसेच यानंतर कोणतेही आरोप करताना आधी विचार करावा आणि नंतरच बोलावे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMalvan police stationमालवण पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग