शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भवितव्याच्या चिंतेमुळे वैभव नाईक पालकमंत्र्यांना भेटले असावेत, नितेश राणे यांचा टोला

By सुधीर राणे | Updated: February 17, 2024 15:23 IST

कणकवली: आमदार  वैभव नाईक आणि त्यांचे कुटुंब हे मूळ शिवसैनिक नाहीत. ते मूळ काँग्रेसी आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या निष्ठेबाबत ...

कणकवली: आमदार  वैभव नाईक आणि त्यांचे कुटुंब हे मूळ शिवसैनिक नाहीत. ते मूळ काँग्रेसी आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या निष्ठेबाबत सांगणे हे हास्यास्पद आहे. उद्धव ठाकरे यांचा दौरा एवढा झंझावाती झाला की, थेट त्यांच्या आमदाराला येऊन आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घ्यावी लागली. असा टोला लगावतानाच त्या झंझावाती दौऱ्याचे विश्लेषण करायचे म्हटले तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर कोणाचाही विश्वास नाही म्हणून वैभव नाईक आपल्या भवितव्याबाबत काही होऊ शकते का, हे विचारायला आले असतील. पण, रवींद्र चव्हाण यांना भाजप व संघटनेपेक्षा मोठे काही नाही आहे, त्यामुळे योग्य तो निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली. भाजप नेते तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भेट घेतली.त्यावरून जिल्ह्यातिल नागरिकांमध्ये सध्या चर्चा रंगली आहे. त्याबाबत नितेश राणे म्हणाले, वैभव नाईक आपल्या भवितव्याच्या चिंतेमुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भेटले असतील. संजय राऊत व त्यांच्या मालकाला अचानकच शेतकऱ्यांची चिंता वाटू लागली आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम आमच्या भाजप सरकारने केले आहे. जे काँग्रेसला जमले नाही ते भाजप सरकारने केले. शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन निधी देऊ असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. मात्र, कोकणातल्या शेतकऱ्यांना एक दमडीही मिळालेली नाही.कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळेल. मनोज जरांगे-पाटील हे समाजाच्या हितासाठी लढत आहेत. फसवणूक होणार नाही. जरांगेनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करावे. जरांगेनी राजकीय वक्तव्य करू नये. आपण समाज बांधव म्हणून एकत्र काम करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जरांगे बोलल्यामुळेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांनी राजकीय वक्तव्य बंद करावे, असेही राणे यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले, अजित पवार यांना व्हीलन करण्यात आले, पण , तेच लोक आता तोंडघशी पडले आहेत. पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा आशीर्वाद होता, मात्र नंतर अजित पवार यांना व्हीलन करण्यात आले, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Nitesh Raneनीतेश राणे