शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पसंती मालवणला; समुद्रकिनारे हाऊसफुल, समुद्री खेळांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 15:54 IST

सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं विविध पिकनिट डेस्टिनेशन्सकडे वळली.

- महेश सरनाईक

सिंधुदुर्ग- सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं विविध पिकनिट डेस्टिनेशन्सकडे वळली. अनेक पर्यटकांनी सुट्टी घालविण्यासाठी कोकणाची निवड केली. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले तीन दिवस हजारो पर्यटक राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झाले आहेत. सर्व बीच हाऊसफूल झाले असून पर्यटक समुद्राच्या लाटांवर स्वार होत सुट्टी एन्जॉय करत आहेत.सिंधुदुर्गात सध्या जोरदार थंडी असून ओखी वादळाने थंडीचा हंगाम लांबला आहे. त्यामुळे गुलाबी थंडी, सुट्टी आणि सगळीकडे पसरलेली गर्द हिरवी वनराई यामुळे सिंधुदुर्गातील वातावरण उल्हासवर्धक आहे. त्यामुळे पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाली आहे. सिंधुदुर्गातील महत्वाचे बीचमालवण शहरातील चिवला,  तारकर्ली, देवबाग, कोळंब, आचरा, तोंडवळी या मालवण तालुक्यातील मिठबाव, कुणकेश्वर, देवगड, विजयदुर्ग या देवगड किनारपट्टीवरील तर वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे, निवती, केळूस, खवणे, कोंडुरा, वेंगुर्ले बंदर, आरोंदा, वेळागर, शिरोडा, रेडी आदी महत्वाचे बीच पर्यटकांनी गजबजून गेले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटकपश्चिम महाराष्ट्र म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आदी भागातून पर्यटकांच्या गाड्या भरून सिंधुदुर्गात दाखल झाल्या आहेत. दोन ते तिन दिवसांचा प्लान करून कुटुंबच्या कुटुंब कोकण पर्यटनाला आले आहेत.

बांगडा मच्छीवर तावमालवणी जेवणाची चव काही न्यारीच आहे. भात, मासे, कोकम कडी, घावणे, उसळ, आंबोळी, कोंबडी वडे आदीला पसंती आहेच, मात्र सर्वाधिक पसंती बांगडा, सुरमई, पापलेट, कोळंबीला मिळत आहे. मालवणी जेवणात मालवणमध्ये फेमस असलेल्या बांगड्याला प्रचंड मागणी आहे.

समुद्री क्रीडा प्रकारांना प्राधान्यगोव्याप्रमाणे समुद्री खेळ आता सिंधुदुर्गातही सुरू झाल्याने तसेच स्कुबा डायव्हिंगमुळे समुद्र तळाशी खजिना पाहण्याची संधी उपलब्ध झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.