शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

वाभवे-वैभववाडी नगरपंचायत सभा: अनुपस्थित नगरसेवक 'सूचक'?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 17:49 IST

सर्वसाधारण सभेला हजर नसलेल्या नगरसेवकाचे एका ठरावाला चक्क 'सूचक' म्हणून नाव घातल्याचा धक्कादायक प्रकार भाजपचे स्वीकृत नगरसेवक सज्जन रावराणे यांनी सभेत उघड केला. तर आम्ही सूचविलेल्या विकास कामांना सूचक म्हणून दुस-यांची नावे इतिवृत्तात घातली जात असल्याबद्दल नगरसेवक संतोष माईणकर यांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देधक्कादायक प्रकार सज्जन रावराणेंनी केला उघड 'प्रिंट मिस्टेक' सांगून मुख्याधिका-यांकडून पडदा

वैभववाडी: सर्वसाधारण सभेला हजर नसलेल्या नगरसेवकाचे एका ठरावाला चक्क 'सूचक' म्हणून नाव घातल्याचा धक्कादायक प्रकार भाजपचे स्वीकृत नगरसेवक सज्जन रावराणे यांनी सभेत उघड केला. तर आम्ही सूचविलेल्या विकास कामांना सूचक म्हणून दुस-यांची नावे इतिवृत्तात घातली जात असल्याबद्दल नगरसेवक संतोष माईणकर यांनी नाराजी व्यक्त केली.

या गंभीर प्रकराबाबत संताप व्यक्त करीत 'असा बोगस कारभार करण्यापेक्षा नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्त करा',अशी मागणी रावराणे यांनी केली. त्यावेळी मुख्याधिका-यांनी कर्मचा-यांना खडसावत 'प्रिंट मिस्टेक' झाल्याचे सांगून विषयावर पडदा टाकला.वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीनची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा दीपा गजोबार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपनगराध्यक्ष रवींद्र तांबे, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, बांधकाम सभापती संतोष पवार, आरोग्य, शिक्षण सभापती समिता कुडाळकर, नगरसेवक संजय चव्हाण, रवींद्र रावराणे, संतोष माईणकर, सरिता रावराणे, रोहन रावराणे, अक्षता जैतापकर, मनिषा मसूरकर, संपदा राणे, शोभा लसणे आदी उपस्थित होते.वाभवे गांगो मंदिरापर्यंत रस्ता तयार करण्याचा विषय मी मांडला होता. परंतु, त्या ठरावाला माज्याऐवजी सूचक म्हणून दुस-याचे नाव कसे घातले? आम्ही सुचविलेल्या विकास कामांना सुचक का बदलता? अशी विचारणा नगरसेवक संतोष माईणकर यांनी केली. तोच धागा पकडून सज्जन रावराणे यांनी 'नगरपंचायत प्रशासन खोटा कारभार करीत असल्याचा आरोप करीत स्वप्नील ईस्वलकर मुंबईत आहेत.

सभागृहात उपस्थित नसताना ते ठरावाला सूचक कसे होऊ शकतात?' असा प्रश्न उपस्थित करुन 'बोगस कारभार करण्यापेक्षा नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्त करा', असा संताप रावराणे यांनी व्यक्त केला. रावराणेंनी हा धक्कादायक प्रकार उघड केल्यानंतर मुखाधिकारी कंकाळ यांनी नगरपंचायत कर्मचा-यांना खडसावत ती 'प्रिंट मिस्टेक' आहे. यापुढे असे होणार नाही सांगत विषयावर पडदा टाकला.शहरात स्वच्छतेची कामे होत नाहीत. बाजारपेठेत मोजून १८ मते आहेत. पण सहा कर्मचारी बाजारातच काय ती स्वच्छता करतात. अन्य भागात कोणीही फिरकत नसल्याचा आरोप सज्जन रावराणे यांनी केला. त्यावेळी स्वच्छता कामगारांना प्रभाग वाटून दिले असून त्यांना वही दिलेली आहे. ठरलेल्या दिवशी प्रभागात साफसफाई झाल्यावर संबंधित नगरसेवकांनी त्या वहीवर स्वाक्षरी करावी, असे आरोग्य सभापती समिता कुडाळकर यांनी स्पष्ट केले. तर स्वच्छता कामगार कमी आहेत. कामगार वाढविण्यासाठी निविदा मागवली असून ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शहरातील स्वच्छतेची घडी बसेल. आठवडाभरात ही संपुर्ण परिस्थिती सुधारले, असे कंकाळ यांनी सांगितले.कलादालनाच्या उद्घाटन सोहळ्यात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शहराच्या पर्यटन विकासासाठी २ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्या निधीतून संभाजी चौकात लॅडस्केपसह बगीचा, महाराणा कलादालनाचे विद्युतीकरण, परिसराचे सुशोभीकरण, व्यावसायिक गाळे तसेच प्रभाग क्रमांक ६ मध्ये बगीच्या आदी कामे करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती कंकाळ यांनी दिली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग