शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोळंब पूल बांधकामासाठी खाऱ्या पाण्याचा वापर, ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 14:05 IST

गेली तीन वर्षे दुरुस्ती सुरू असलेल्या कोळंब पुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र काँक्रीटीकरण कामास खाडी पात्रातील खारे पाणी पंपाद्वारे उपसा करून वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी उघडकीस आणला. दरम्यान, ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेनंतर पुलावर उपस्थित झालेल्या बांधकाम अधिकारी प्रकाश चव्हाण व ठेकेदार यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले.

ठळक मुद्देकोळंब पूल बांधकामासाठी खाऱ्या पाण्याचा वापर, ग्रामस्थ संतप्त बांधकाम अधिकारी व ठेकेदार धारेवर

मालवण : गेली तीन वर्षे दुरुस्ती सुरू असलेल्या कोळंब पुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र काँक्रीटीकरण कामास खाडी पात्रातील खारे पाणी पंपाद्वारे उपसा करून वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी उघडकीस आणला.दरम्यान, ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेनंतर पुलावर उपस्थित झालेल्या बांधकाम अधिकारी प्रकाश चव्हाण व ठेकेदार यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले.

कोळंब पूल दुरुस्ती बांधकामासाठी खाडीत पंप लावून खाऱ्या पाण्याचा उपसा सुरू होता.चार दिवस ठेकेदार खाडीतील पाणी वापर करत होता. त्यामुळे सुरू असलेल्या कामाची तपासणी करावी. तसेच दर्जाहीन काम करणाºया ठेकेदारावर कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका लवकरात लवकर दुरुस्ती करून पूल वाहतुकीस खुला न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी कोळंब पूल संघर्ष समितीचे सेक्रेटरी प्रमोद कांडरकर, माजी अध्यक्ष गोपीनाथ तांडेल, संदीप भोजने, बाळा आंबेरकर, नितीन आंबेरकर, सखाराम मालाडकर, संदीप शेलटकर, बाळा पराडकर, जितेंद्र भोजने, सुरेश बापर्डेकर व अन्य उपस्थित होते.दरम्यान, ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेनंतर पूल दुरुस्तीचे काम करणाºया कामगारांनी पाणी उपसासाठी लावलेला पंप लपवून ठेवला. मात्र पंपाद्वारे खाडीपात्रातून सुरू असलेल्या पाणी उपसाचे फोटो व व्हिडीओ ग्रामस्थांनी काढून ठेवल्याने ठेकेदारासह बांधकाम विभाग कात्रीत सापडला आहे.ठेकेदाराला नोटीस; प्रत वरिष्ठ कार्यालयाकडे; आमदारांच्या आश्वासनाचे काय?कोळंब पूल दुरुस्ती पूर्ण करण्यास ठेकेदारास १५ मे पर्यंत वाढीव मुदत मुख्य अभियंता यांनी दिली आहे. त्यापूर्वी काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे. काम होताच सुरुवातीला दुचाकी सुरू होतील. मात्र बस व मोठी वाहने वाहतूक सुरू करण्यापूर्वी पुलाची तपासणी करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.लोकसभा निवडणूक काळात आमदार वैभव नाईक यांनी कोळंब पूल १ मे पासून वाहतुकीस खुला होईल असे सांगितले होते. मात्र, पुलाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यामुळे आमदारांचे आश्वासन निवडणूक काळासाठी होते का ? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. तर आश्वासन देण्यापूर्वी आमदारांनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली होती का? असा सवाल कोळंब पूल संघर्ष समितीचे सेक्रेटरी प्रमोद कांडरकर यांनी उपस्थित केला आहे.संथ गतीने सुरू असलेले काम तसेच बांधकामावर खारे पाणी मारण्याचा सुरू असलेला प्रकार याबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे. नोटीसीची प्रत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग