कोळंब पूल बांधकामासाठी खाऱ्या पाण्याचा वापर, ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 02:01 PM2019-05-02T14:01:40+5:302019-05-02T14:05:27+5:30

गेली तीन वर्षे दुरुस्ती सुरू असलेल्या कोळंब पुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र काँक्रीटीकरण कामास खाडी पात्रातील खारे पाणी पंपाद्वारे उपसा करून वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी उघडकीस आणला. दरम्यान, ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेनंतर पुलावर उपस्थित झालेल्या बांधकाम अधिकारी प्रकाश चव्हाण व ठेकेदार यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले.

Use of saline water for construction of cochlea bridge, villagers angry | कोळंब पूल बांधकामासाठी खाऱ्या पाण्याचा वापर, ग्रामस्थ संतप्त

पूल बांधकामासाठी खाऱ्या पाण्याचा वापर होत असल्याने ग्रामस्थांनी बांधकाम अधिकारी व ठेकेदाराला धारेवर धरले.

Next
ठळक मुद्देकोळंब पूल बांधकामासाठी खाऱ्या पाण्याचा वापर, ग्रामस्थ संतप्त बांधकाम अधिकारी व ठेकेदार धारेवर

मालवण : गेली तीन वर्षे दुरुस्ती सुरू असलेल्या कोळंब पुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र काँक्रीटीकरण कामास खाडी पात्रातील खारे पाणी पंपाद्वारे उपसा करून वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी उघडकीस आणला.
दरम्यान, ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेनंतर पुलावर उपस्थित झालेल्या बांधकाम अधिकारी प्रकाश चव्हाण व ठेकेदार यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले.


कोळंब पूल दुरुस्ती बांधकामासाठी खाडीत पंप लावून खाऱ्या पाण्याचा उपसा सुरू होता.

चार दिवस ठेकेदार खाडीतील पाणी वापर करत होता. त्यामुळे सुरू असलेल्या कामाची तपासणी करावी. तसेच दर्जाहीन काम करणाºया ठेकेदारावर कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका लवकरात लवकर दुरुस्ती करून पूल वाहतुकीस खुला न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी कोळंब पूल संघर्ष समितीचे सेक्रेटरी प्रमोद कांडरकर, माजी अध्यक्ष गोपीनाथ तांडेल, संदीप भोजने, बाळा आंबेरकर, नितीन आंबेरकर, सखाराम मालाडकर, संदीप शेलटकर, बाळा पराडकर, जितेंद्र भोजने, सुरेश बापर्डेकर व अन्य उपस्थित होते.

दरम्यान, ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेनंतर पूल दुरुस्तीचे काम करणाºया कामगारांनी पाणी उपसासाठी लावलेला पंप लपवून ठेवला. मात्र पंपाद्वारे खाडीपात्रातून सुरू असलेल्या पाणी उपसाचे फोटो व व्हिडीओ ग्रामस्थांनी काढून ठेवल्याने ठेकेदारासह बांधकाम विभाग कात्रीत सापडला आहे.

ठेकेदाराला नोटीस; प्रत वरिष्ठ कार्यालयाकडे; आमदारांच्या आश्वासनाचे काय?

कोळंब पूल दुरुस्ती पूर्ण करण्यास ठेकेदारास १५ मे पर्यंत वाढीव मुदत मुख्य अभियंता यांनी दिली आहे. त्यापूर्वी काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे. काम होताच सुरुवातीला दुचाकी सुरू होतील. मात्र बस व मोठी वाहने वाहतूक सुरू करण्यापूर्वी पुलाची तपासणी करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक काळात आमदार वैभव नाईक यांनी कोळंब पूल १ मे पासून वाहतुकीस खुला होईल असे सांगितले होते. मात्र, पुलाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यामुळे आमदारांचे आश्वासन निवडणूक काळासाठी होते का ? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. तर आश्वासन देण्यापूर्वी आमदारांनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली होती का? असा सवाल कोळंब पूल संघर्ष समितीचे सेक्रेटरी प्रमोद कांडरकर यांनी उपस्थित केला आहे.

संथ गतीने सुरू असलेले काम तसेच बांधकामावर खारे पाणी मारण्याचा सुरू असलेला प्रकार याबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे. नोटीसीची प्रत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांनी दिली.

 

Web Title: Use of saline water for construction of cochlea bridge, villagers angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.